Bigg Boss Marathi 6 Contestants : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा प्रसिद्ध रिअॅलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजनाने भरलेला असणार असून यंदाच्या पर्वासाठीही सर्वांना तितकीच उत्सुकता आहे. या वर्षी देखील शोचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहेत, ज्यांनी मागील सीझनमध्ये त्यांच्या नैसर्गिक, कडक पण प्रेमळ अंदाजामुळे प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
रितेश म्हणतात की, बिग बॉस घरात दररोज नवीन वळणं आणि आव्हाने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. घरातील सदस्यांच्या वागणुकीमधील विविध पैलू उलगडून दाखविण्याचा हा एक रोमांचक अनुभव असेल. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक भाग घेणार? याबद्दल अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे पूर्ण यादी जाहीर केलेली नाही. परंतु १६ हून अधिक कलाकार व सामाजिक माध्यमांवर चर्चेत असलेले चेहरे हे घरात सहभागी होण्याची शक्यता आहे. हा सीझन १३,००० चौरस फूट क्षेत्रामध्ये सज्ज केलेल्या भव्य घरातून प्रेक्षकांना मनोरंजन देणार आहे.
रितेश देशमुख म्हणाला की, “बिग बॉसचा खेळ म्हणजे नशीबाचा गेम कोणते दरवाजे उघडतील, हे कोणालाही माहीत नाही.” घरात सहभागी होणाऱ्या सदस्यांमध्ये भावना, मैत्री, मतभेद आणि गोंधळ यांचा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल, जे या शोला आणखी रंगीन बनवेल.
सोशल मीडियावर या वर्षी काही स्पर्धकांची यादी लीक झाली असून त्यात काही कलाकारांची नावे चर्चेत आहेत, पण त्याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही. या चर्चेमुळे प्रेक्षकांचं उत्साह अधिक वाढलेलं दिसतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.