Aamir Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : आमिर खानचे विवाहबाह्य संबंध; लग्न न करता मुलगा, भावाच्या आरोपाने खळबळ, कोण आहे जेसिका हाइन्स?

Faisal Khan Allegations On Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या भावाने आमिरवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे.

Shreya Maskar

आमिर खान पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

फैसल खानने आमिरवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे.

आमिर खानला लग्न न करता मुलगा असल्याचे फैसल खानने सांगितले.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आता पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. अलिकडेच आमिर खानचा भाऊ फैसल खानने (Faisal Khan) त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फैसल खानने कुटुंबियांसोबत सर्व नाते तोडत आहे. फैसल खान नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

फैसल खानने सांगितल्याप्रमाणे, आमिर खानचे रीनासोबत लग्न झालेले असताना तो किरण रावसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. तसेच त्याच वेळी आमिरचे आणखी एक अफेअर देखीस सुरू होते. ज्यातून त्यांना एक मुलगा देखील आहे. आमिर खानचे जेसिका हाइन्ससोबत संबंध होते. फैसल खान सांगितले की, आमिर खानचे किरण रावसोबत लग्न झाले होते. त्याने रीनाला घटस्फोट दिला. त्यानंतर जेसिका हाइन्ससोबत त्याचे अनैतिक संबंध होते. असा आरोप आमिर खानच्या भावाने फैसल खानने केला आहे. जेसिका ही पत्रकार आहे.

फैसल खानने एका पत्रात कुटुंबातील प्रत्येक सदस्याविषयी लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, "मी माझ्या कुटुंबावर रागावलो तेव्हा एक पत्र लिहिले होते. कारण घरातून माझ्यावर लग्नासाठी दबाव होता. माझ्या वडिलांनी दोनदा लग्न केले. चुलत बहिणीने दोनदा लग्न केले. यावर मी म्हणालो, तुम्ही मला लग्नाचे सल्ले काय देणार? मला हवं तसे आयुष्य जगू दे. हे सर्व पत्रात लिहिल्यामुळे खूप वाद वाढला. कुटुंबाने मी वेडा झालो आहे असे ही म्हटले."

आमिरचे वैयक्तिक आयुष्य

आमिर खानने बर्थडे पार्टीमध्ये त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. आमिर खानने गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले असून त्यांचा घटस्फोट 2006 मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आमिर खानने 2024 पासून गौरीला डेट करायला सुरुवात केली आणि आता 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vandana Gupte: पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडले...; वंदना गुप्तेंच्या पायाला झाली दुखापत मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाल्या...

Viral Video: सेल्फीच्या नादात मुलगी पडली धबधब्यात, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Metro T2 Walkway : वाहतूक कोंडीला मिळणार पूर्णविराम! मेट्रो ते विमानतळ टर्मिनलचा प्रवास आता फक्त काही मिनिटांत

B Sudarshan Reddy : इंडिया आघाडीचं धक्कातंत्र, उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा, एनडीएपुढे जोरदार आव्हान

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT