सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
3 Idiots चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे.
अच्युत पोतदार यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar ) यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आजवर त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री 10च्या सुमारास निधन झाले आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालावली.
अच्युत पोतदार यांचे साधे राहणीमान आणि उत्तम अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांचा 3 इडियट्स या चित्रपट खूप गाजला. चित्रपटात त्यांनी प्रोफेसरची भूमिका साकारली होती. सिनेमात त्यांनी आमिर खानसोबत काम केले. 2009 साली '3 इडियट्स' प्रेक्षकांच्या भेटीला आला.
अच्युत पोतदार यांचा जन्म 22 ऑगस्ट 1934 रोजी झाला. ते मध्य प्रदेशातील जबलपुर येथील मराठी कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच त्यांनी भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून सेवा केली आहे. त्यानंतर त्यांनी इंडियन ऑइलमध्ये देखील काम केले आहे.
अच्युत पोतदार यांचा अभिनय हा छंद होता. त्यांनी 1980 मध्ये रिलीज झालेल्या 'आक्रोश' हिंदी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी हिंदी चित्रपटांसोबत मराठी चित्रपट, नाटक, जाहिराती आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचे परिंदा, दामिनी, फरारी की सवारी, दबंग 2 हे हिंदी चित्रपट खूप गाजले. तसेच नवरी मिळे नवर्याला, ये रे ये रे पैसा हे मराठी चित्रपट त्यांनी केले आहेत.
अच्युत पोतदार यांनी अमिता का अमित, माझा होशील ना या मालिकांमध्ये काम केले आहे. अच्युत पोतदार यांनी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 3 इडियट्समधील त्यांचा "अरे कहना क्या चाहते हो.." हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.