Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Surabhi Jayashree Jagdish

फुल क्रीम दूध

दही घट्ट लागण्यासाठी शक्यतो फुल क्रीम दुधाचा वापर करावा. या दुधामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे दही अधिक मलईदार आणि घट्ट तयार होतं. टोंड किंवा स्किम्ड दुधाच्या तुलनेत फुल क्रीम दूध अधिक चांगला परिणाम देते.

Homemade Yogurt | saam tv

दूध व्यवस्थित उकळून थोडं आटवा

दूध चांगलं उकळल्यानंतर काही मिनिटं मंद आचेवर ठेवून किंचित आटवावं. यामुळे दुधातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन दही अधिक घट्ट लागण्यास मदत होतं. मात्र दूध जास्त आटवू नये, अन्यथा त्याची चव बदलू शकते.

Curd | saam tv

दूध कोमट होईपर्यंत थंड करा

उकळलेलं दूध थेट विरजण घालण्यासाठी वापरू नये. दूध कोमट होईपर्यंत थंड झाल्यावरच त्यामध्ये विरजण मिसळावं. दूध खूप गरम किंवा खूप थंड असल्यास दही व्यवस्थित लागत नाही.

Milk | saam tv

ताज्या दह्याचं विरजण वापरा

कोमट दुधामध्ये एक ते दोन चमचे ताजं दही विरजण म्हणून घालावं. विरजण दूधामध्ये पूर्णपणे मिसळलं जाईल याची खात्री करावी. ताजं आणि चांगल्या प्रतीचं विरजण वापरल्यास दही उत्तम लागतं.

Curd Recipe | saam tv

भांडे उबदार ठिकाणी ठेवा

विरजण घातलेलं दूध झाकण लावून उबदार ठिकाणी ठेवावं. पावसाळ्यात तापमान कमी असल्यास भांडं स्वच्छ कापडात गुंडाळल्यासही फायदा होतो. योग्य उब मिळाल्यास दही लवकर आणि चांगलं लागतं.

Thick Yogurt | saam tv

सहा ते आठ तास

दही लागण्याच्या प्रक्रियेदरम्यान भांडं वारंवार हलवू किंवा उघडू नये. किमान सहा ते आठ तास ते स्थिर ठेवणं आवश्यक असतं. भांडे हलवल्यास दही सैल राहण्याची शक्यता वाढते.

Homemade Dairy | saam tv

दही लागल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा

दही पूर्णपणे लागल्यानंतर ते दोन ते तीन तास फ्रिजमध्ये ठेवावं. यामुळे दह्याचा पोत अधिक घट्ट होतो आणि चवही छान लागते.

Set Curd Naturally | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Chest discomfort
येथे क्लिक करा