अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

Manasvi Choudhary

चिवळी भाजी

चिवळीची भाजी पावसाळ्यात रानावनात, शेतात, बांधावर उगवते. चिवळी भाजी रानघोळ किंवा खाटेचौनाळ या नावांनी देखील ओळखली जाते.

Chivali Bhaji

आरोग्यासाठी फायदेशीर भाजी

अत्यंत चवदार लागणारी ही भाजी कॅन्सर, मूळव्याध, या आजारांवर गुणकारी आहे. वजन कमी होण्यासाठी देखील ही भाजी खातात.

Chivali Bhaji

सोपी रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने चिवळी भाजी रेसिपी बनवू शकता.

Chivali Bhaji

साहित्य

चिवळीची भाजी, कांदा, बेसन, तेल, मोहरी, हळद, मसाला, मीठ हे साहित्य घ्या.

Chivali Bhaji

भाजी बारीक चिरून घ्या

चिवळीची भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी चिवळीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

Chivali Bhaji

कांदा परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी आणि बारीक कापलेला कांदा चांगला परतून घ्या. नंतर यात हळद मिक्स करा.

Onions Chopping | yandex

मसाले मिक्स करा

चिवळीच्या भाजीमध्ये लाल मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. थोड्यावेळ भाजीवर झाकण ठेवा म्हणजे भाजी वाफेवर चांगली शिजेल.

spices | pintrest

चिवळीची भाजी तयार

नंतर या भाजीमध्ये बेसन मिक्स करा. भाजीला वाफ आली की भाजीचे झाकण काढा. गरमा गरम चिवळीची भाजी तयार होईल.

Chivali Bhaji

NEXT: पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Weight Loss Drink | Saam Tv
येथे क्लिक करा...