अभिनेत्री शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे.
शिवाली परब शाहरुख खानच्या गाजलेल्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
'मोहब्बत हो गई...' या गाण्यावर शिवाली बेभान होऊन नाचली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) फेम अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तसेच शिवाली अनेक वेळा डान्सचा देखील भन्नाट व्हिडी शेअर करते. तिच्या डान्समधील कातिल अदा चाहत्यांना खूप आवडतात. नुकतीच शिवाली परबने जबरदस्त डान्सची रील पोस्ट केली आहे.
शिवाली परब शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) गाजलेल्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यात तिला कोरिओग्राफर रुपेश बने याने साथ दिली आहे. शिवाली 'मोहब्बत हो गई...' या गाजलेले शाहरुख खानच्या गाण्यावर बेभान होऊन नाचली आहे. हे गाणे 1999 साली रिलीज झालेल्या 'बादशाह' चित्रपटातील आहे. चित्रपटात शाहरुख खानसोबत ट्विंकल खन्ना झळकली आहे. 'मोहब्बत हो गई...' (Mohabbat Ho Gayi Hai ) गाण्याच्या काही भन्नाट स्टेप्स करताना शिवाली परब व्हिडीओत दिसत आहे.
शिवाली परबने व्हिडीओला खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "तुमच्या प्रेमाने कमेंट सेक्शन भरा..." तिचा हा डान्स पाहून चाहत्यांनी लय भारी कमेंट्स केल्या आहेत. कमेंट्समध्ये तिचे कौतुक केले आहे. "मस्त", "अप्रतिम", तुम्हा दोघांनाही खूप प्रेम", "गोड आणि सुंदर शिवा", "लय भारी", "एकदम कडक डान्स", "खूप छान" अशा कमेंट्सचा व्हिडीओवर पाऊस पडला आहे.
शिवाली परबचा डान्समध्येही कॉमेडी अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप भारी आहेत. मोकळे केस आणि नो मेकअप लूकमध्ये शिवाली खूपच गोड दिसत आहे. तिने निळ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. कमेंट्समध्ये डान्सच्या कोरिओग्राफीचे देखील कौतुक होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.