Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न ? अनेक वर्षांनंतर केला खुलासा

Rajesh Khanna and Anita Advani: राजेश खन्ना यांची कथित प्रेयसी अनिता अडवाणी हिने सांगितले की, राजेश खन्ना यांनी त्यांच्याशी गुपचूप लग्न केले होते.
Rajesh Khanna and Anita Advani
Rajesh Khanna and Anita AdvaniSaam tv
Published On

Rajesh Khanna and Anita Advani: बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये डिंपल कपाडियाशी लग्न केले. त्यानंतर १९८२ मध्ये दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांनीही कधीही घटस्फोट घेतला नाही. तथापि, राजेश खन्नाच्या अभिनेत्री अनिता अडवाणीशी असलेल्या नात्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. आता अनेक वर्षांनंतर अनिता म्हणाल्या की राजेश खन्ना यांनी त्यांच्याशी गुप्तपणे लग्न केले होते.

त्यांनी लग्नाची घोषणा का केली नाही?

मेरी सहेलीशी खास संभाषणात अनिता म्हणाल्या, "आम्ही गुप्तपणे लग्न केले, पण चित्रपटसृष्टीत कोणीही या सर्व गोष्टींबद्दल उघडपणे बोलत नाही. प्रत्येकजण म्हणतो की आम्ही मित्र आहोत, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत किंवा आणखी काही. पण मीडियामध्ये आधीच माहित होते की मी त्याच्यासोबत आहे, म्हणून आमच्यापैकी कोणालाही सार्वजनिकपणे लग्नाची घोषणा करण्याची गरज वाटली नाही."

Rajesh Khanna and Anita Advani
Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

त्यांनी घरीच मंदिरात लग्न केले

अनिता पुढे म्हणाल्या, "आमच्या घरात एक मंदिर होते. त्याने माझ्यासाठी मंगळसूत्र बनवून घेतले, मला काळे आणि सोनेरी बांगड्या घालायला सांगितले. मग त्याने मला सिंदूर लावला आणि म्हणाला की आजपासून तू माझी जबाबदारी आहेस. असे आम्ही एका रात्री लग्न केले."

Rajesh Khanna and Anita Advani
Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

अनिता यांनी असाही दावा केला की ती डिंपलच्या खूप आधी राजेश खन्नाच्या आयुष्यात आली होती, परंतु त्यावेळी दोघांनीही लग्न केले नाही कारण ती खूप लहान होती. तिने सांगितले की राजेश खन्नाच्या कुटुंबाने तिला त्यांच्या अंतयात्रेत देखील (राजेश खन्नाच्या) सामील होऊ दिले नाही आणि तिला रोखण्यासाठी बाउन्सर तैनात केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com