Aai Kuthe Kay Karate Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karate: ...त्यांच्यासाठी वेळेचं काहीच बंधन नाहीये, 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karate Serial Timing Change: 'आई कुठे काय करते' ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणारी ही मालिका आता दुपारी 2.30 वाजता प्रसारित केली जात आहे. टीआरपी कमी झाल्यामुळे मालिकेच्या वेळेमध्ये बदल केला असल्याचे म्हटले जात होते.

Priya More

Aai Kuthe Kay Karate Serial:

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या सर्वात जास्त पसंतीची मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सध्या ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये देखील टॉपला आहे.

अशामध्ये आता या मालिकेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणारी ही मालिका आता दुपारी 2.30 वाजता प्रसारित केली जात आहे. टीआरपी कमी झाल्यामुळे मालिकेच्या वेळेमध्ये बदल केला असल्याचे म्हटले जात होते. पण आता हे असं का केलं यामागचे कारण त्याचसोबत आता मालिकेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे हे या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुखचे पात्र साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने (Milind Gawali) पोस्ट करत सांगितली आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिलिंद गवळीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भलीमोठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने असे लिहिले की, 'आई कुठे काय करते' आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता. जवळजवळ सव्वाचार वर्षे आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनल लागलेला असायचा, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो, असंख्य कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडे 'आई कुठे काय करते' ही मालिका आवर्जून बघितली जाते. त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही. आयपीएल असली तरीसुद्धा साडेसात वाजता 'आई कुठे काय करते' ही मालिका बघितली जायची.'

तसंच, 'आता 18 मार्चपासून निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसातच्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल. संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का? असा एक मनामध्ये प्रश्न येत होता. पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या-ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की, 'आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का!' मला हे ऐकून छान वाटलं आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे. मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात. त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये. संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टारवर असो बघणारे हे आवडीने बघतातच.', असे सांगितले.

मिलिंद गवळीने यावेळी स्टार प्रवाहसोबत संपूर्ण मालिकेच्या टीमचे कौतुक केले आहे. त्याने पुढे सांगितले की, 'बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे. आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत? पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट, ही इतक्या लवकर कशी संपू शकेल. जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये इंटरेस्टिंग, अनप्रेडिक्टेबल आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारं घडत असतं. आजही मला काम करताना तेवढीच मजा येते आहे. बरं इथे बाहेर अतिशय ऊन वाढलेला आहे. 37\38 डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर. तुम्ही पण सगळे काळजी घ्या भरपूर पाणी पीत जा. शक्यतो उन्हात जाऊ नका. अडीच वाजता स्टार प्रवाह वर 'आई कुठे काय करते' बघा.' असं सांगत मिलिंद गवळीने आपल्या चाहत्यांना उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT