Ram Kapoor Kiss Controversy: अभिनेता राम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओमध्ये राम कपूर लोकप्रिय इन्फ्लुएन्सर लैला उर्फ वरुण यादवसोबत लिपलॉक करताना दिसत असल्याने नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राम कपूर आणि लैला एका मजेशीर रीलचा भाग असल्याचे दिसते. सुरुवातीला दोघांमधील चर्चा होतो मस्ती मज्जा होते. त्यानंतर अचानक दोघे एकमेकांना किस करताना दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
लैला हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वरुण यादव याचे फेमस ऑनस्क्रीन पात्र आहे. महिलांचा लूक, कॉमेडी आणि हटके कंटेंटमुळे वरुण यादव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. राम कपूरसोबतचा त्याचा हा व्हिडीओ प्रसिद्ध होताच लाखो व्ह्यूज मिळाले आणि त्यावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या.
व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी राम कपूरवर टीका करत, प्रसिद्धी मिळवण्यासाठी मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. एका नेटकऱ्याने लिहिले, 'शो फेमस व्हावा म्हणून काहीही करतात' तर दुसऱ्याने लिहिलं, 'काही तरी मर्यादा ठेवा.' तर आणखी एकाने लिहिलं, 'हे सगळं दाखवण्याची राम कपूर काही गरज नाही.' दरम्यान, राम कपूरची पत्नी गौतमी कपूरचे नावही या चर्चेत ओढले जात आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी लिहिलं हा व्हिडिओ बघून तुझ्या बायकोला काय वाटेल याचा तरी विचार कर.
राम कपूर हे दूरदर्शन आणि ओटीटी विश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. 'बडे अच्छे लगते हैं', 'कसम से' यांसारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दुसरीकडे, वरुण यादवही आपल्या 'लैला' या पात्रामुळे डिजिटल विश्वात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.