Toxic : यशच्या 'टॉक्सिक'मध्ये ग्लॅमरचा तडका; नयनतारा, कियारासह पाच अभिनेत्रींची दमदार एंट्री

Toxic : यशच्या बहुचर्चित 'टॉक्सिक' चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशीसह पाच अभिनेत्रींच्या दमदार लूकने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Toxic
ToxicSaam Tv
Published On

Toxic : दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: अ फेरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता चित्रपटाचा नवीन 'लेडीज अँड लेडीज' टीझर प्रदर्शित झाला असून, यात चित्रपटातील पाच प्रमुख अभिनेत्रींची दमदार झलक पाहायला मिळते. याआधी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये यशच्या रोलवर भर देण्यात आला होता. मात्र, आता महिला कलाकारांच्या दमदार एन्ट्रीने सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा रंगली आहे.

या टीझरमध्ये नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया या पाच अभिनेत्रींचे वेगवेगळे आणि डेंजर लूक पाहायला मिळतात. प्रत्येक अभिनेत्रीचा लूक, तिची बॉडी लँग्वेज आणि स्क्रीन प्रेझेन्स चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची झलक दाखवतो.

Toxic
Director Death: मराठी रंगभूमीवरील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

यशने याआधी सोशल मीडियावर "Ladies take time to come" असे म्हणत या पाच अभिनेत्रींच्या टीझरची घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर हा खास टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Toxic
Pooja Sawant: जांभळा ड्रेस अन् कानात झुमके...; पूजा सावंतचा एलिगंट लूक व्हायरल

'टॉक्सिक'चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी केले आहे. हा चित्रपट एका स्टायलिश गँगस्टर ड्रामा असणार आहे. यशचा हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजी भाषेत चित्रित करण्यात आला असून,हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळमसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

'टॉक्सिक' चित्रपटामध्ये यशसह नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांची खास भूमिका असणार आहे. यशच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेतील आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com