Dhule Crime Saam tv
क्राईम

Crime: माझ्या पुतणीशी का बोलतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली, मुलीच्या काकाला जागीच संपवलं

Dhule Crime: धुळ्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. पुतणीशी बोलण्यावरून झालेल्या वादातून तरुणाने मुलीच्या काकाची निर्घृण हत्या केली. या घटनेप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • धुळ्यामध्ये हाणामारीत तरुणाचा मृत्यू

  • पुतणीशी बोलण्याच्या वादातून ही घटना घडली

  • दत्तू रामचंद्र गवळी यांचा मारहाणीत मृत्यू झाला

  • आरोपी किसन गुलाब साबळेला पोलिसांनी केली अटक

भूषण अहिरे, धुळे

धुळ्यामध्ये हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुतणीसोबत बोलण्याच्या वादातून हाणामारीची घटना घडली होती. या हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळ्याच्या साक्रीमधील हनुमंतपाडा येथे घडली. या प्रकरणी पोिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे धुळयात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे किरकोळ वादातून ही घटना घडली. पुतणीशी का बोलतो यावरू वाद झाला होता. सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर झालेल्या हाणामारीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दत्तू रामचंद्र गवळी असे मृत तरुणाचे नाव होते. हनुमंतपाडा गावातील छोटीराम गवळी यांच्या किराणा दुकानाजवळ दत्तू गवळीची हत्या करण्यात आली होती. किसन गुलाब साबळे (२२ वर्षे) या तरुणाने दत्तू गवळीची हत्या केली होती.

आरोपी किसन गुलाब साबळे हा तरुण किराणा दुकानाजवळ थांबलेला होता. त्यावेळी माझ्या पुतणीसोबत का बोलत उभा आहे? असं म्हणत दत्तू गवळी यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात किसन साबळेने दत्तू गवळी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर किसनने दत्तू गवळीला जमिनीवर आपटल्याने तो बेशुद्ध पडला.

या हाणामारीमध्ये दत्तू गवळी गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत पिंपळनेर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दत्तू गवळीचा मृत्यू झाला. या प्रकरणी दत्तू गवळीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची दखल घेत पिंपळनेर पोलिस ठाण्यात किसन साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून आरोपी किसनला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे हनुमंतपाडा गावात काही काळ तणावाचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT