Crime x
क्राईम

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Bangalore Crime: एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका योगा प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या योगा प्रशिक्षकाला अटक

  • पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

  • योगा शिकवण्याच्या बहाण्याने छळ केल्याचा होतोय आरोप

Shocking : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका योगा प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी मागील अनेक वर्षांपासून बंगळुरूमधील राजराजेश्वरी नगरमध्ये एक योगा केंद्र चालवत आहे. तो कर्नाटक योगासना स्पोर्ट्स असोसिएशनचा सचिव देखील आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीने योगा शिकवणाऱ्या प्रशिक्षकावर अनेक आरोप केले आहे. पीडिता २०१९ पासून आरोपी योगा प्रशिक्षकाला ओळखते. २०२१ मध्ये तिने योगाशी संबंधित स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. २०२३ मध्ये पीडित तरुणीने त्या प्रशिक्षकासह योगा कार्यक्रमासाठी थायलंडला गेली होती. त्यावेळी पीडिता फक्त १७ वर्षांची होती.

थायलंडला योग कार्यक्रमासाठी जात असताना प्रवासादरम्यान आरोपीने माझा लैंगिक छळ केला असा आरोप पीडित तरुणीने केले आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने योग स्पर्धांमध्ये सहभागी होणे बंद केले. त्यानंतर तरुणी २०२४ मध्ये सनशाइन इन्स्टिट्यूटमध्ये योग प्रशिक्षणात सामील झाली. या ठिकाणीही आरोपीने माझा छळ केला असे पीडित तरुणीने म्हटले आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील योग स्पर्धेत पदक जिंकवून देण्याचे आणि प्लेसमेंट मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. २२ ऑगस्ट रोजी प्लेसमेंटची व्यवस्था करण्याच्या बहाण्याने त्याने पुन्हा पीडितेचे शोषण करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर योगा प्रशिक्षकांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला आणि एका ठिकाणी लपून बसला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोध घेत आरोपी योगा प्रशिक्षकाला अटक केली. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने पोलीस या गंभीर प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT