Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

Pakistan Fraud : जपानमध्ये एका बनावट पाकिस्तानी फुटबॉल संघाचा पर्दाफाश झाला आहे. फुटबॉलपटू असल्याचा बनाव करुन हे लोक जपानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.
Pakistan Fruad
Pakistan Fruadai
Published On
Summary
  • जपानमध्ये पाकिस्तानी बनावट फुटबॉल संघाचा पर्दाफाश झाला.

  • बनावट एनओसीसह जपानमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात २२ जणांना अटक.

  • बनावट कागदपत्रांवरून सर्वांना जपानमधून हद्दपार करण्यात आले.

Pakistan Fruad Team : क्रीडा विश्वात सध्या पाकिस्तानला अपमान सहन करावा लागत आहे. आशिया कप २०२५ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान संघाशी शेकहँड करण्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तानी संघाने आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे युटर्न घेत ते यूएई विरुद्ध सामने खेळले. या सर्व प्रकरणामध्ये जगासमोर पाकिस्तानची लाज निघाली आहे. यूएईमध्ये अपमान होत असतानाच पाकिस्तानने जपानमध्ये मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या एका फुटबॉल स्पर्धेमध्ये सहाभागी होण्यासाठी पाकिस्तानने एक बनावट फुटबॉल संघ जपानला पाठवला. अधिकाऱ्यांना संघावर, संघातील खेळाडूंवर संशय आला. चौकशीदरम्यान सर्व खेळाडू बनावट असल्याचे आढळून आले. या बनावट पाकिस्तानी संघाला तात्काळ जपानमधून हद्दपार करण्यात आले आहे.

Pakistan Fruad
Voter List : मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा, एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान तपास संस्था एफआयएने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे बनावट खेळाडू बेकायदेशीरपणे जपानमध्ये प्रवेश करण्याा प्रयत्न करत होते. पाकिस्तान फुटबॉल संघाचे सदस्य असल्याचे भासवत होते. त्यांनी पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनशी संबंध असल्याचा दावा केला होता. फुटबॉल खेळाडू असा आव आणणाऱ्यांकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे बनावट एनओसी असल्याचे आढळून आले. या प्रकरणामध्ये एकूण २२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Pakistan Fruad
Crime : लग्नासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या, कोळशात जाळलं अन् मृतदेह नाल्यात फेकला

जपानमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना फुटबॉल संघातील खेळाडूंवर संशय आला. चौकशी केल्यानंतर फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले. बनावट कागदपत्रांसह जपानमध्ये आलेल्या सर्वांना पाकिस्तानला जाणाऱ्या विमानात बसवून हद्दपार करण्यात आले आहे. हे लोक पाकिस्तानहून जपानला जाणाऱ्या विमानात कसे चढले याचा तपास सुरु आहे.

Pakistan Fruad
Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

या संपूर्ण कटाचा सूत्रधार मलिक वकास असल्याचे म्हटले जात आहे. मलिक हा सियालकोटमधील पसरूरचा रहिवासी होता. वकास गोल्डन फुटबॉल ट्रायल नावाचा बनावट फुटबॉल क्लब चालवत असे. क्लबच्या नावाने प्रवास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून अंदाजे ४० ते ४५ लाख रुपये घेतले जात असत. त्याला १५ सप्टेंबर रोजी अटक झाली आहे.

Pakistan Fruad
Crime : छातीला स्पर्श करायचा, नको त्या जागी हात...; महिला सहकाऱ्यांची तक्रार, नराधम डॉक्टरला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com