Uttar Prades Ci Saam Tv
क्राईम

Shocking News: मैत्रिणीच्या घरून परतत होती, गुंगीचे औषध देऊन तरुणीवर 23 जणांनी 7 दिवस केला बलात्कार

Uttar Pradesh Cirme News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एका तरुणीवर तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीन बलात्कार केला. आळीपाळीने २३ जणांनी या तरुणीवर बलात्कार केला. कशी तरी ही तरुणी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि घरी पोहचली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणीवर २३ जणांनी सात दिवस बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेने फक्त उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. तरुणीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर नराधमांनी वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ६ जणांना अटक केली. बाकीच्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ मार्च २०२५ रोजी घडली. या दिवशी पीडित तरुणी तिची मैत्रिण रियाच्या घरून आपल्या घरी परत जात असताना तिला वाटेमध्ये राज विश्वकर्मा नावाचा तरुण भेटला. राजने तिला लंकेतील एका कॅफेमध्ये नेले आणि तिथे रात्रभर तिच्यासोबत वाईट कृत्य केले. दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी समीर नावाच्या एका मुलाने त्याच्या मित्रासह मुलीला त्याच्या बाईकवर जबरदस्ती बसवले आणि वाटेत तिच्याशी वाईट वर्तन केले. त्यानंतर ३१ मार्च रोजी आयुष त्याच्या ५ मित्रांसह सोहेल, दानिश, अनमोल, साजिद आणि जाहिदसह मुलीला कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये घेऊन गेला. तिला नशेचे औषध पाजल्यानंतर सर्वांनी एक एक करून तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर नराधम तरुणीला वेगवेग्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करतच राहिले. वेगवेगळ्या दिवशी साजिद, इम्रान, जैब, अमन, राज खान, दानिश, सोहेल, शोएब आणि इतर आरोपींनी मुलीला हॉटेल, कॅफे, गोदामे, टेरेस, रूम आणि निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती मुलगी कशीतरी ४ एप्रिल रोजी घरी पोहोचली आणि तिने तिच्या आईला संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली.

पीडित तरुणीसोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या आईला मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली. लालपूर पांडेपूर पोलिस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. १२ जणांची ओळख पटली आहे. ११ जण अज्ञात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक केली. तर इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेपासून पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय मानसिक धक्क्यात आहेत. पोलिसांकडून त्यांची काऊंसलिंग सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

SCROLL FOR NEXT