Crime News x
क्राईम

Crime : पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेली होती मुलगी, जवानानं बंद कॅन्टिनमध्ये बोलावून केलं भयंकर कृत्य

Crime News : भारतीय सैन्यातील एका जवानाला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी जवानावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • अल्पवयीन मुलीवर विनयभंग

  • कुटुंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार

  • सैन्यातील जवानाला अटक

Shocking : लष्करातील एका जवानावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लष्करी जवानाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने सोशल मीडियावर या बाबत लाईव्ह स्ट्रीमिंग केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना उत्तराखंडमधील चमोली येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील थरली हा धक्कादायक प्रकार घडला आहे.लष्कराच्या सीएसडी कॅन्टीनमध्ये तैनात असलेल्या एका जवानाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (५ ऑक्टोबर) संध्याकाळी पीडिता तिच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेली होती तेव्हा ही घटना घडली.

अल्पवयीन मुलगी तिच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपी जवानाने बंद असलेल्या कॅन्टीनचे कुलूप उघडले, त्याने मुलीला आत बोलावले आणि तिचा विनयभंग केला. घाबरलेली मुलगी जेव्हा घरी परतली, तेव्हा तिने तिच्या आईला कॅन्टीनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ थरली एसडीम आणि स्थानिक पोलीस ठाण्यात लष्करातील जवानाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकारही सांगितला. जवानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे, असे पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज कुमार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

HBD Shah Rukh Khan : परदेशात बंगले अन् लग्जरी कार; बॉलिवूडचा 'किंग' कोट्यावधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT