Uttar Pradesh Shocking  Saam tv
क्राईम

Shocking : ७ मुलांची आई भाच्याच्या प्रेमात झाली खुळी; नवऱ्याकडून ३ लाख घेऊन पळाली, दुसऱ्या गावात संसारही थाटला

Uttar Pradesh Shocking : ७ मुलांच्या आईने भाच्यासोबत संसार थाटल्याची घटना घडली आहे. या महिलेने नवऱ्याचे ३ लाख रुपयेही घेतले.

Saam Tv

७ मुलांची आई २२ वर्षीय भाच्यासोबत पळाली

पतीने तिला घराच्या कामासाठी ₹३ लाख दिले होते.

राजकुमारच्या पत्नीने कोर्ट मॅरेज केल्याचे सांगून मुलांची जबाबदारी नाकारली

पती राजकुमारकडून पोलिसांत तक्रार

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये महराजगंज कोतवाली हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. ७ मुलांची आई २२ वर्षीय भाच्यासोबत पळाल्याची घटना घडली आहे. या महिलेने भाच्यासोबत दुसऱ्या गावात संसारही थाटला. बायकोच्या धक्कादायक कृत्यानंतर पीडित नवऱ्याने ७ मुलांना घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचली गावात राहणारा राजकुमार हा दिल्लीत एका फार्म हाऊसवर माळी म्हणून काम करत होता. त्याने २ ऑगस्ट रोजी पत्नी ललतीला गावी पाठवलं. तसेच तिला ३ लाख रुपयांची रोकड दिली. राजकुमारने पत्नीला गावातील निर्माणाधीन घरावर पत्रे टाकण्यासाठी ३ लाख रुपये दिले होते. पुढे एका आठवड्याने राजकुमारने गावी भावाला फोन केला. तेव्हा भावाकडून माहिती जाणून त्याची पायाखालची जमीन सरकली. त्याची बायको गावी देखील पोहोचली नव्हती. तसेच तिने घरासाठी पत्रे देखील खरेदी न केल्याचे भावाकडून समजले.

राजकुमार याने नंतर दुसऱ्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याची पत्नी लालती हैदरगढ पोलीस हद्दीतील देवैचा गावात राहत असल्याची माहिती मिळाली. नातेवाईकाने लालती २२ वर्षीय भाचा उदयराजसोबत घरात राहत असल्याचेही सांगितले. यानंतर राजकुमार काही नातेवाईकांसोबत देवैचा गावात पोहोचला, त्यावेळी पत्नी लालतीने सांगितलं की, 'मी उदयराजसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. आता त्याच्यासोबत राहू इच्छित आहे'. राजकुमाकरने मुलांसाठी घरी परतण्याची विनंती केली. तर पत्नी लालती म्हणाली की, 'मला आता मुलांशी काही देणंघेणं नाही'. पत्नी लालतीच्या उत्तराने राजकुमार निराश झाला.

निराश झालेला राजकुमार सात मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला. त्याने पोलिसांत पत्नी विरोधात गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. ही घटना केवळ कौटुंबिक विवाद नसून सामाजिक मूल्य, कौटुंबिक जबाबदारी आणि मुलांच्या भविष्यांशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे या महिलेवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT