
ट्रॅम्प टॅरिफचा शेअर बाजाराला दणका
ट्रॅम्प टॅरिफमुळे बाजारात पडझड
शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना दणका
शेअर बाजारात मंगळवारी व्यवहाराच्या सुरुवातीला पडझड पाहायला मिळाली. तर शेअर बाजार बंद होतानाही पडझड कायम राहिली. शेअर बाजारात दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही इंडेक्स कोसळले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअरवाला सेन्सेक्स ८४९ अंकानी कोसळून बंद झाला. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सजेंजचा निफ्टी इंडेक्स २२५ अंकांनी घसरून बंद झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे बोलले जात आहे.
बीएसई सेन्सेक्स मंगळवारी सकाळी ८१,३७७ अंकांनी सुरु झाल्यानंतर दिवसभर घसरण कायम राहिली. शेअर बाजार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स ८०,६८५.९८ अंकावर स्थिरावला. शेअर बाजार बंद होण्याच्या काही मिनिट आधी गुंतवणूकदारांचं थोडं नुकसान भरुन निघालं. मात्र, शेअर बाजारात आज मंगळवारी सेन्सेक्स ८४९.३७ अंकांनी म्हणजे १.०४ टक्क्यांनी घसरून ८०,७८६.५४ अंकावर बंद झाला. निफ्टीमध्येही घसरण पाहायला मिळाली. निफ्टी दिवसभरात २५५.७० अंकांनी म्हणजे १.०२ टक्क्यांनी घसरून २४,७१३.०५ अंकावर बंद झाला.
शेअर बाजारात मंगळवारी बड्या कंपन्याच्या शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजार बंद झाल्यावर लार्जकॅप कॅटेगरीमधील सनफार्मा (३.४०टक्के), टाटा स्टील शेअर (२.८८ टक्के), बजाज फायनान्स शेअर (२.६७ टक्के), ट्रेन्ट शेअर (२.४५ टक्के), एम अँड एम शेअर (२.०२ टक्के) बजाज फिनसर्व्ह शेअर (२ टक्के), रिलायन्स स्टॉक (२ टक्के), एक्सिक्स बँक शेअर (१.८६ टक्के) घसरून बंद झाले.
मीडकॅप कॅटेगिरीममधील पीईएल शेअर (४.८१ टक्के), Gillette शेअर (3.४९ टक्के), Solar Inds शेअर (३.४४ टक्के), बंधन बँक शेअर (३.३० टक्के), एमआरएफ शेअर (३.२८ टक्के) घसरून बंद झाला. तर स्मॉल शेअरमधील infobeam शेअर (८.३८ टक्के), जेके पेपर शेअर (७.३८ टक्के) पर्यंत घसरून बंद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.