Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

gopichand padalkar on rohit pawar : गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका केली. कोल्हापुरात बोलताना रोहित पवारांवर टीका केली.
Gopichand Padalkar controversial remarks on Christian priests
Gopichand Padalkar controversial remarks on Christian priestsSaam TV News
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'रोहित पवार हे औरंगजेबासारखे आहेत. ते औरंगजेबाच्या वृत्तीचे आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वत:च्या भावाचा घात केला. मात्र, अजित पवार त्यांना पुरुन उरणार आहेत. त्यामुळे ते टिकले आहेत. मात्र, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते, असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाण साधला. ते कोल्हापुरात बोलत होते.

Gopichand Padalkar controversial remarks on Christian priests
Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी राज्यातील घडामोडीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी रोहित पवारांवरही जोरदार प्रहार केला. रोहित पवारांवर टीका करताना पुढे म्हणाले, 'डुप्लिकेटपणा हा रोहित पवारांमध्ये ठासून भरलेला आहे. रोहित पवार हे आजोबांवर गेले आहेत. रोहित पवारांमध्ये प्रचंड डुप्लिकेटपणा आहे. रोहित पवारांच्या चुलत्याने कालच त्यांची अब्रू काढली. पोस्टल मतावर निवडून आला आहे, असं अजित पवारांनी रोहित पवारांना भाषणातून सांगितलं'.

Gopichand Padalkar controversial remarks on Christian priests
Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

'रोहित पवारांनी माझ्याविषयी काय भाष्य केले, त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. मला काळजी अजित पवारांच्या मुलांची वाटते. कारण रोहित पवार हे औरंगजेबासारखा आहे.. औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. रोहित पवार हे औरंगजेबासारखी कृती अजित पवारांच्या मुलांबरोबर करेल, असा मला संशय आहे'.

Gopichand Padalkar controversial remarks on Christian priests
Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

'मला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी पवारांना पुरून उरलो आहे. रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करणं गरजेचं आहे. रोहित पवार सरकारच्या नाकात दम आणताय, अशी कोणतीही परिस्थिती नाही. माध्यमांमध्ये बातमी लागली म्हणजे तुम्ही शासनाच्या नाकात दम आणला असं होत नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला हा बाळ लोकांच्यात कधी जाणार? गावात गेल्यावर प्रश्न करतात, हा गावात जाणार कधी? रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा. पोस्टल मतांवर निवडून आल्याचं लक्षात ठेवावं. उद्या तिथून ते निवडूनही येणार नाहीत, असे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com