Fake Medicines Yandex
क्राईम

Fake Medicines: तुम्ही बनावट औषधे खाताय? फेक मेडिसिन गँगचा पर्दाफाश, कारखान्यावर छापा, कोट्यवधींची औषधे जप्त

Fake Medicines Business Busted: दिल्लीजवळील गाझियाबाद येथे बनावट औषधांचा कारखाना पकडला गेला आहे. सुमारे १ कोटी रूपयांचा औषधांचा साठा जप्त केला आहे.

Rohini Gudaghe

Uttar Pradesh Crime News

गाझियाबादमध्ये (Ghaziabad) बनावट औषधांचा कारखाना पकडला गेला आहे. औषध विभागानं घटनास्थळावरून 1 कोटी 10 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. ही बनावट औषधे नामांकित कंपन्यांच्या नावानं पॅकिंग करून विकली जात होती. गाझियाबादच्या राजेंद्र नगर आणि भोपुरा भागात ही कारवाई झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कारखाना सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. (Latest Crime News)

दिल्लीजवळील गाझियाबाद येथील एका कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. येथे या एलईडी बल्ब कारखान्यात उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अँटासिडची बनावट औषधे (Fake Medicines) तयार करून बाजारात विकली जात होती. दिल्ली पोलिसांच्या 'क्राइम ब्रँच'ने या कारखाना आणि गोदामातून 1 कोटी 10 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बनावट औषधांच्या कारखान्यावर छापा

या कारखान्यात ब्रँडेड औषधांची नक्कल करून बनावट औषधे बनवली जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मोठी बाब म्हणजे येथे तयार होणारी बनावट औषधे हैदराबादपर्यंत पुरवली जात (Uttar Pradesh Crime) होती. या कारखान्यात नामांकित कंपन्यांची बनावट औषधे मोठ्या प्रमाणात तयार होत होती. औषध विभागाच्या पथकाने लाखो रुपयांची बनावट औषधे बनवणारी उपकरणे, तसंच बनावट औषधं बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त केला आहे.

गाझियाबादमधील औषध विभागाला एका कारखान्यात बनावट औषधे तयार होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर 4 मार्चपासून मोठ्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून छापा टाकण्यात आला. गाझियाबाद ड्रग्ज विभाग, दिल्ली गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गॅस, शुगर, बीपी यांसारख्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

बनावट औषधांचा साठा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चौहान नावाचा व्यक्ती हा कारखाना चालवत होता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. औषध विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून गेल्या एक वर्षापासून बनावट औषधे बनविण्याचा कारखाना सुरू (Fake Medicines Business Busted) होता. आरोपींनी तळमजल्यावर एलईडी बल्ब दुरुस्तीचा कारखाना उभारला होता, तर वरच्या मजल्यावर बनावट औषधे तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं.

या छाप्यात लाखो रुपयांचा कच्चा माल, मशीन आणि बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत. तपास पथकाने 14 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. औषध विभागाच्या पथकाने साहिबााबाद पोलिस ठाण्यात बनावट औषधे बनवणे, विक्री करणे आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर आशुतोष मिश्रा यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसीर, साहिबाबाद परिसरात बनावट औषधे तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. बनावट औषधे बनविणाऱ्यांवर पथक नजर ठेवून होते. विभागीय अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा आणि साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या पथकासह सर्वेक्षण केलं. बनावट औषधे बनवणाऱ्या कारखान्यातून सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, ग्लेनमार्क या प्रसिद्ध कंपन्यांची बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT