साम टिव्ही ब्युरो
सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी खोकला झाला आहे.
खोकल्यावर उपाय म्हणून तुम्ही गरमागरम हळदीचं दूध पिऊ शकता.
सुंठ किंवा आल्याची पावडर सर्दी-खोकल्यावर गुणकारी आहे.
मध देखील खोकला ठिक करण्यासाठी मदत करते.
गरम पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या केल्याने घशाला आराम मिळतो.
कफ पातळ होण्यासाठी आणि सुका खोकला जाण्यासाठी गुळ देखील फायदेशीर ठरतो.
लसनाची पाकळी ठेचून त्यावर थोडे मिठ आणि हळद टाकून अंगठ्याने पडजिभेवर ठेवावे. याने देखील खोकला ठिक होण्यास मदत होते.
या घरगुती उपायांपैकी कोणताही एक उपाय किमान ८ दिवस करावा त्याने तुम्हाला नक्की बरं वाटेल.