UP Sitapur Crime News Saam tv
क्राईम

Uttar Pradesh Crime News: एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; युवकाने आई-बायको आणि ३ मुलांना संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेश येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशमधील एका कुटुंबातील तब्बल ६ जणांचा एकाचवेळी मृत्यू झाला आहे. सीतापूर येथे ही घटना घडली आहे. एकाच घरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

सीतापूर येथील रामपूर मथुरा पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पल्हापूर गावातील एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ही संपूर्ण घटना समोर आली आहे. मृत व्यक्तींच्या घराजवळ मृतदेह पाहून शेजारच्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. घरातील एका व्यक्तीने त्याची आई, पत्नी आणि मुलांची हत्या केल्याने सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक विभागाच्या मदतीने पुरावा गोळे केले जात आहेत. घराच्या आता वेगवेगळ्या ठिकाणी ६ जणांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पहाटे ही घटना घडली. या घटनेत एक लहान बाळ जखमी अवस्थेत सापडले. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोपी व्यक्तीने सर्वप्रथम आपल्या आईची, पत्नीची आणि मुलाची हत्या केली. त्यानंतर स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दारुच्या नशेत त्याने हा गुन्हा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT