Actor Wife Fraud Case: एक फोन कॉल अन् बँक खात्यातून लाखो रुपये गायब; 'गदर 2' फेम अभिनेत्याच्या पत्नीला लाखोंचा गंडा

Gadar 2 Fame Rakesh Bedi Wife Fraud Case: 'गदर 2' फेम अभिनेता राकेश बेदी यांच्या पत्नीची फसवणूक झाली आहे. राकेश बेदी यांच्या पत्नीच्या खात्यातून जवळपास पाच लाख रुपये गायब झाल्याचा धक्कादाक प्रकार घडला आहे.
Actor Wife Fraud Case
Actor Wife Fraud CaseGoogle

'गदर 2' फेम अभिनेता राकेश बेदी यांच्या पत्नीची फसवणूक झाली आहे. राकेश बेदी यांच्या पत्नीच्या खात्यातून जवळपास पाच लाख रुपये गायब झाल्याचा धक्कादाक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्ब ४८ तासात या गुन्हाचा छडा लावला आहे.

राकेश बेदी यांच्या पत्नीला एक बनावट फोन कॉल आला होता. याच फोन कॉल मुळे खात्यातील जवळपास पाच लाख रुपये गायब झाले होते. राकेश बेदी यांच्या पत्नीच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांच्या खात्यातून ५ लाख रुपये गायब झाले होते. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच बेदी यांच्या पत्नीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाईला सुरुवात केली.

पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने सायबर अधिकारी अशोक कोंडे यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी खात्यातून गायब झालेली रक्कम फ्रिज केल्यामुळे बेदी कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी फ्रीज केलेली रक्कम बेबी यांना सुपूर्त देखील करण्यात आली आहे. ओशिवरा सायबर पोलीस पथकाने अवघ्या 48 तासात ही कारवाई केली आहे.यामुळे राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलिसांचे आभार देखील मानले आहेत. दरम्यान जानेवारी 2024 मध्ये देखील अशाच प्रकारे राकेश बेदी यांची देखील फसवणूक झाली होती.

Actor Wife Fraud Case
Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?

राकेश बेदी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी याआधी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. राकेश बेदी यांनी जरा हटके जरा बचके आणि गदर 2 चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राकेशी बेदी यांच्या अभिनयाचे नेहमीच चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Actor Wife Fraud Case
The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com