Karnataka News: साखरपुडा मोडला, नराधम पिसाळलाच! तिचं मुंडकं छाटून गावभर फिरला, मन सुन्न करणारी घटना

Karnataka Crime News: . साखरपुडा मोडला म्हणून एका युवकाने अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं. ज्या मुलीसोबत युवकाचं लग्न ठरलं होतं, ते लग्न मोडल्यानंतर युवकानं मुलीची हत्या केली.
Karnataka Crime News Today
Karnataka Crime News TodaySaam Tv

Karnataka Crime News Today:

कर्नाटकमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आलीय. साखरपुडा मोडला म्हणून एका युवकाने अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं. ज्या मुलीसोबत युवकाचं लग्न ठरलं होतं, ते लग्न मोडल्यानंतर युवकानं मुलीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे नंतर या मुलीचा शिरच्छेद करुन तिचं छाटलेलं डोकं या युवकानं हातात घेत गावभर फिरवलं. कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील एका गावात हा खळबळजनक प्रकार घडलाय.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका अल्पवयीन मुलीनं लग्न लावण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांनी मुलीच्या घरातल्यांची समजूत घालत हे लग्न रोखण्यात यश मिळवलं. पण साखरपुडा झाल्यानंतर लग्न थांबल्यामुळे मुलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो बिथरला आणि रागातूनच त्याने संतापजनक कृत्य केलं.

Karnataka Crime News Today
Nagpur News : संतापजनक! नागपुरात रिक्षाचालकाचे शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य

तिने नुकतीच बोर्ड परीक्षा पास केली, पण...

16 वर्षांच्या मुलीसोबत 32 वर्षांच्या प्रकाशचं लग्न ठरलं होतं. पण मुलीचं लग्नाचं वय झालेलं नसल्यानं प्रशासनानं याप्रकरणी गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांची समजूत घातली आणि हे लग्न होणअयापासून रोखलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनीही बालविवाह रोखण्याासठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकून हे लग्न करण्यास नकार दिला. 16 वर्षीय मुलीनं नुकतीच बोर्डाची परीक्षा देत 52 टक्के गुणही मिळवले होते. मात्र घरातल्यांनी या मुलीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तोच अखेर तिच्या जीवावर उठलाय.

लग्न मोडल्यानं तो बिथरला?

16 वर्षीय मुलीसोबत लग्न करुन संसाराच स्वप्न पाहिलेल्या 32 वर्षीय प्रकाशला लग्न मोडलेल्याची कल्पना जराही रुचली नाही. बिथरलेल्या प्रकाशने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयावर जबर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने मुलीचा जीव घेत तिचा शिरच्छेद केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या हल्ल्यात पीडित मुलीची आईही गंभीररीत्या जखमी झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या संपूर्ण हत्याकांड आणि हल्लाप्रकरणामागील ठोस कारण नेमकं काय आहे, याचा कसून तपास केला जातोय, असं पोलिस प्रशासनानं म्हटलंय.

Karnataka Crime News Today
Mumbai Tragedy: IIT ग्रॅज्युएट तरुणानं संपवलं जीवन; त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?

पोलिस काय म्हणाले?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागील हेतू अद्याप कळू शकलेला नाही. दरम्यान, मारेकरीही फरार आहे. त्याचा शोध घेतला जातोय. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीचं होऊ घातलेलं लग्न थांबवणअयात आलं होतं, असंही पोलिसांनी म्हटलंय.

16 वर्षीय मुलीचा जीव घेत, तिचा मुंडकं छाटण्यापर्यंत 32 वर्षीय युवकाची गेलेली मजल, अनेक सवाल उपस्थित करणारी आहे. या घटनेचे स्थानिक पातळीवर गंभीर पडसाद उमटत असून आता याप्रकरणी आरोपीला नेमकी अटक कधी होते आणि त्याच्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com