पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात शाळकरी मुलींना घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालकाच्या या विकृत प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला घरी सोडून देण्याऐवजी तिला निर्जनस्थळी नेल. त्यानंतर या रिक्षाचालकाने शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. एका जागरुक व्यक्तीने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारानंतर सोशल मीडियावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शोध घेत रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. त्यनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयाचा देखील शोध घेतला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संवेदनशीलता लक्षात यात पाऊले उचलली. सुरुवातीला आई-वडिलांची प्रतीक्षा पाहिली. मात्र, आई-वडील पोलीस स्टेशनपर्यंत येऊ न शकल्याने पोलिसांनी सुमोटो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शाळेचे अंतर दूरवर असतात, त्यासाठी मुलांना सोडण्यासाठी खाजगी वाहनांचा पर्याय असतो. मात्र त्या मुलांना शाळेतून घरी सुखरूप नेण्याची जबाबदारी असणाऱ्या एका रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याने सोशल मीडियावर रोष व्यक्त होताना दिसून आला. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये सुमोटो घेत कारवाई केली. पण पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यासोबत संवाद वाढवण्याची गरज असल्याच सांगितलं.
अशा घटनांबाबत पालकांनी पाल्याशी संवाद वाढून त्या उघडकीस आणता येते. अशा घटनाबाबत लपून न ठेवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरून अशा पद्धतीच्या घटनांना आळा बसवता येईल. त्याचबरोबर असे कृत्य करणाऱ्या नराधमांना जेरबंद करता येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.