Navapur Crime News Saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime News: बहिणीचा मोबाईल मागितला म्हणून भावावर प्राणघातक हल्ला, कोयत्याने सपासप वार; उल्हासनगरमध्ये खळबळ

Maharashtra Breaking News: या तरुणाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर, ता. ११ ऑगस्ट २०२४

बहिणीचा मोबाईल परत घेण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. या हल्ल्यामध्ये सुजल ससाने हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शांतीनगर भागात रात्री साडेबारा वाजता एका तरुणावर हल्ला करण्यात आला. या तरुणाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अरविंद गवळी हा तरुण सुजल ससानेच्या बहिणीचा मोबाईल घेऊन गेला होता. तो मोबाईल घेण्यासाठी सुजलने अरविंदला फोन करून कुठे आहे? माझ्या बहिणीचा मोबाईल दे, तिला सकाळी कामावर जायचे आहे, असं सांगितले. तेव्हा अरविंद मोबाईल घेण्यासाठी सुजलला दगडी बंगल्याजवळ बोलवले. सुजल तेथे गेला असता अरविंद मागून येऊन सुजलच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.

या हल्ल्यामध्ये सुजल ससाने वाचला, मात्र सुजलच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावरती मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. दरम्यान, या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का! निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

SCROLL FOR NEXT