Police and forensic teams investigate the crime scene where a tribal woman was found dead in a field near a canal in East Burdwan. saam tv
क्राईम

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

Tribal Woman Physical Assaulte And Killed Case In West Bengal: पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी २४ तासांत दोन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालमधील बरूईपूर येथे एका चिमुर्डीसोबत अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर आता पूर्व बर्धमान जिल्ह्यातून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवानदीघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पलीतपूर कालव्याजवळील परिसरात एका आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण झाले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे. बुधवारी पाच सदस्यीय फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय आदिवासी गृहिणी राणी यांचा मृतदेह मंगळवारी पलितपूर कालव्याजवळील शेतात आढळून आला. त्यांचे सासर दिघिरपार येथे असले तरी त्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या माहेरी पलितपूर येथे राहत होत्या.

काय म्हणाले कुटुंबीय?

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दुपारी राणी हेमराम या आपल्या पतीच्या शोधात घराबाहेर पडल्या होत्या. नंतर त्यांचे पती घरी परतल्यावर राणी त्यांना शोधण्यासाठी बाहेर गेल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी त्यांचा शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर पलितपूर कालव्याजवळील शेतात त्यांचा रक्ताने माखलेला आणि जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

माहिती मिळताच देवानदीघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी बर्धमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवला. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकून दिला. कुटुंबीय आणि स्थानिक आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

२४ तासांत आरोपी अटकेत

कुटुंबीयांच्या लेखी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाच्या २४ तासांत दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची नावे शेख अजीजुल आणि शेख भदाई अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अजीजुल याला देवानदीघी परिसरातून अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी शेख भदाई याला बीरभूम जिल्यातील नानूर परिसरातून ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT