Shahapur Crime:  Saamtv
क्राईम

Shahapur Crime: कसारा घाटात फिल्मी स्टाईल थरार! वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

Kasara Ghat Breaking: गेल्या तीन चार दिवसांपासून कसारा घाटत वाहनांना अडवून लुटण्याचे प्रकार समोर येत होते.

Gangappa Pujari

फय्याज शेख, प्रतिनिधी

Nashik Breaking News:

शहापूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून कसारा घाटत वाहनांना अडवून लुटण्याचे प्रकार समोर येत होते. अखेर या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून टोळीतील दोघांना कसारा पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन चार दिवसांपासून नवीन व जुन्या कसारा घाटात (Kasara Ghat) वाहनांना लुटण्याचे प्रकार समोर येत होते. या टोळीकडून घाटातील गाड्या अडवून तसेच रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडफेक करत चाकू व पिस्तूलाचा धाक दाखवून चालकांकडून पैसे व गाडीतील सामान चोरी करून पसार होत होते.

आज पहाटे (गुरूवार, ९ नोव्हेंबर) जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्यावर एक वाहन बंद पडले होते. याचाच फायदा घेत चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे व वाहनातील सामान घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी गाडी चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढून पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस जुन्या कसारा घाटात दाखल झाले मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस घाटात असतानाच नवीन कसारा घाटात वाहनांवर दगड फेकून अडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपला मोर्चा नवीन कसारा घाटत वळवला व मोठ्या शिताफीने रोहन सुनिल सोनवणे (रा. इगतपुरी तळेगाव) महेश लहानू बिन्नर (रा. लतीफवाडी, शहापूर) यांना जेरबंद केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT