Crime News Update  
क्राईम

Crime : शिक्षकच भक्षक ठरले! ३ जणांनी शाळकरी मुलीवर केला सामूहिक बलात्कार

Tamil Nadu Crime News: गुरू-शिष्याच्या नात्याला पवित्र समजले जाते. मात्र, या नात्याला एका हैवान शिक्षकाने कलंक लावलाय. तामिळनाडूमध्ये ३ शिक्षकांनी १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केलाय.

Namdeo Kumbhar

Crime News : गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यात एका सरकारी शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. मुलगी शाळेत का आली नाही? हे पाहण्यासाठी हेडमास्तर घरी पोहचल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

१३ वर्षांच्या मुलीच्या पालकांनी शाळेच्या हेडमास्तराला आपल्या मुलीसोबत घडलेला दुर्दैवी प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. हेडमास्तरांनी त्याच दिवशी तात्काळ पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. त्याचवेळी तपास सुरू झाला. शाळेतील इतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आणखी कोणत्या मुलीसोबत असा प्रकार घडलाय का? याचा शोध घेतला जातोय.

१३ वर्षीय मुलीसोबत एका शिक्षाकाने आधी दुष्कर्म केले. त्यानंतर इतर दोन सहकारी शिक्षकांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्या तीन जणांनी पुन्हा त्या १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर तामिळनाडूमधील सरकारी शाळेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, पालकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांकडून या प्रकारणाचा तपास सुरू आहे.

लोकांच्या तीव्र संतापानंतर पोलिसांकडून तिन्ही नराधम शिक्षकाचा कसून शोध घेण्यात आला. कृष्णनगरीचे एसपी पी थंगदुराई यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Pocso कायद्याअंतर्गत तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाळेकडूनही त्या तिन्ही शिक्षकांना सस्पेंड करण्यात आलेय.

पीडित मुलीचे कुटुंबिया, नातेवाईक अन् शेजाऱ्यांनी बुधवारी शाळा आणि परिसरात आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पीडित मुलीला कृष्णनगरी सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT