Crime : आईच्या अफेअरमुळे पोरं नाराज, २ भावांनी मिळून बॉयफ्रेंडला चाकूने सपासप भोसकलं, आतडे हवेत फेकले

crime News Update : १५ वर्षांपासून आईचे अफेअर होते, त्याला दोन्ही मुलं वैतगली होती. दोन भावांनी हा मद्दा गावातील जेष्ठांपुढेही मांडला, पण उपाय निघाला नाही, त्यामुळे दोन जणांनी आईच्या बायफ्रेंडचा काटा काढला
crime
mumbai crime newsgoogle
Published On

Crime News : काळजाचा थरकाप उडवणारी घटना गुजरातमधील गांधीनगरमध्ये घडली आहे. दोन भावांनी आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. रॉडने आधी मारले, त्यानंतर चाकू सपासप वार केले. आतडे हवेत उडवले. या घटनेमुळे गांधीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, मृतक आणि आईचे अफेअर असल्यामुळे आरोपींनी हे पाऊल उचलले. रागाच्या भरात दोन भावांनी त्याचा कोथळा बाहेर काढला अन् हवेत फेकला. ही भयंकर घटना पाहिल्यानंतर सर्वजण हैराण झाले. गांधीनगरमध्ये याचीच चर्चा सुरू आहे.

गांधीनगरमधील मोखासन या गावात ही घटना घडली. दोन भावांनी त्यांच्या आईच्या कथित प्रियकरावर आधी रॉडने हल्ला केला, त्यानंतर चाकूने वार केले. मारेकर यावरच थांबले नाहीत, त्यांनी चाकूने आतडे बाहेर काढले अन् हवेत उडवले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगाचा थरकाप उडाला. पोलिसांनी तात्काळ दोन्ही भावांना बेड्या ठोकल्या आहेत, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

crime
माता न तू वैरिणी! बहिणीला फसवण्यासाठी पोटच्या पोराचा जीव घेतला, ९ महिन्याच्या चिमुकल्याला छतावरून फेकलं

१५ वर्षांपासून अफेअर -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रतनजी ठाकेर हा मिस्त्री म्हणून काम करत होता. मागील १५ वर्षांपासून रतनजी आणि आरोपीच्या आईचं अफेअर होतं. आरोपी संजय ठाकेर आणि जयेश ठाकेर यामुळे रजनजी नाराज होते. त्यांच्या मनात राग होता. रतनजीचा मुलगा अजय यांनी एफआयआरमध्ये सांगितले की, दोन भावांनी आपल्या वडिलांना त्यांच्या आईपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. रतनजीसोबत त्यांचे अनेक वेळा भांडण झाले होते.

crime
Crime : डोक्यात दगड घालून 17 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य, नंतर घेतला जीव, अमरावतीत थरकाप उडवणारी घटना

रतनजीचा मुलगा अजयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दोन्ही भावांनी रतनजीला आपल्या आईपासून दूर राहण्याचा वारंवार इशारा दिला होता, असेही एफआयआरमध्ये म्हटलेय. संजय आणि जयेश यांनी यासाठी पंचायतमध्येही दाद मागितली. गावातील वरिष्ठ नागरिकांच्या हस्तक्षेपानंतरही वाद काही मिटला नाही. त्यामुळे दोघांनी रतनजीचा जीव घेतला, असे म्हटले जातये.

आधी रॉडने हल्ला, मग चाकूने भोसकलं -

पोलिसांनी मोबाईल फोनच्या आधारावर आरोपींना बेड्या ठोकल्या. संजय आणि जयेश यांनी रागाच्या भरात रतनजी याचा खून केला. त्यांनी आधी लोखंडी रॉडने मार मारले. त्यानंतर चाकूने भोकसलं. चाकूने आतडे बाहेर काढले अन् हवेत फेकले. रतनजी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्यावेळी आरोपींनी अंतर्गत अवयव देखील कापले. रजनच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्यांना रॉड अन् चाकूने पळवले. त्यानंतर दुचाकीवरून पळ काढला. पोलिसांनी मोबाईलच्या आधारवर आरोपींना बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com