Bride commits suicide on wedding eve : प्रेमी युगुलाच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केला. मुलीचे बळजबरी लग्न ठरवण्यात आले, त्यामुळे प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीने लग्नाच्या आदल्या रात्री गळफास घेऊन आयुष्य संपवले, तर तिकडे बॉयफ्रेंडने आपले मनगट कापले. सुदैवाने बॉयफ्रेंड वाचला, पण मुलीचा मृत्यू झालाय. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
१८ वर्षीय मुलीला प्रियकरासोबत संसार थाटायचा होता. गेल्या काही दिवसांपासून दोघेजण प्रेमात अखंड बुडाले होते. पण मुलीच्या कुटुंबियांना या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे कुटुंबियाने मुलीचे लग्न ठरवले, साखरपुडाही झाला. लग्नाच्या आदल्या रात्री दोघांनी आपापल्या घरी आत्महत्या केली. मुलगा वाचला, पण मुलीचा जीव गेला.
केरळमधील मलप्पुरम येथील 18 वर्षीय शायमा सिनिवार शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय साजीर याच्या प्रेमात पडली होती. दोघांचं एकमेंकावर प्रेम होतं. या प्रेमाला कुटुंबियांनी विरोध दर्शवला. त्या मुलीचे तात्काळ लग्न ठरवण्यात आले. साखऱपुडा झाल्यानंतर तिचं लग्न होणार होते. पण त्याआधीच मुलीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आयुष्य संपवले.
बॉयफ्रेंडने मनगट कापले -
शायमाने कुटुंबियाना आपण शाजीरसोबत प्रेम करत असल्याचे सांगितले होते. आम्हाला लग्न करायचेय, असेही तिने कुटुंबाला सांगितले. पण कुटुंबाने तिला साफ नकार दिला. त्यामुळे शायमाने गळफास घेत आयुष्य संपवले. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या बायफ्रेंडनेही आपले मनगट कापत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी घरच्यांच्या हे लक्षात आले. त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. शाजीरची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण प्रेयसी सोडून गेल्यामुळे दुखी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.