Solapur Crime: Saam Tv
क्राईम

Solapur Crime: रॉड, बॅट अन् दगड... सोलापुरात भरचौकात तुफान राडा, १५ ते २० जणांनी एकमेकांना तुडवलं

Solapur Police: सोलापूरमध्ये जुन्या भांडणातून दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाने एकमेकांना रॉड, बॅट अन् दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ७ जण जखमी झालेत. या प्रकरणी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. भरचौकात रॉड, बॅट अन् दगडाच्या सहाय्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील कोंतम चौकातील धाकटा राजवाडा परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तुफान राडा झाला. दोन गटात झालेल्या या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हातात रॉड, बॅट आणि दगडाच्या सहाय्याने झालेल्या या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीदरम्यान महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे.

हाणामारीची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सोलापुरातील जोडभावी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दोन्ही गटातील जवळपास १५ जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर सर्व जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली. जुन्या वादातून ही घटना घडली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT