Amravati Crime : वडिलांनी आणलेली दारू मुलाने पिली; रागाच्या भरात पित्याचे भयानक कृत्य, मुलाचा मृत्यू

Amravati News : वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या आहारी गेले होते. रोज दारू पिऊन घरी यायचे. शिवाय घरी देखील दारूच्या बाटल्या आणून रात्री दारू प्यायचे. त्यानुसार मारेकरी पित्याने स्वतःसाठी घरी दारू आणली होती
Amravati Crime
Amravati CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : वडील आणि मुलाला दारूचे व्यसन लागलेले होते. दोघेजण रोज दारू पिऊन नशा करत होते. दरम्यान घरी स्वतःसाठी आणलेली दारू मुलाने पिऊन घेतली. यातून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत पोहचले. यात राग अनावर झाल्याने पित्याने पोटच्या मुलाला झोपेतच बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा गावातील हि धक्कादायक घटना आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या आहारी गेले होते. रोज दारू पिऊन घरी यायचे. शिवाय घरी देखील दारूच्या बाटल्या आणून रात्री दारू प्यायचे. त्यानुसार मारेकरी पिता हिरामण धुर्वे याने स्वतःसाठी घरी दारू आणली होती. घरामध्ये असलेली दारूची बाटली मुलाचा नजरेस पडली. 

Amravati Crime
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार

दारू पिऊन झोपलेल्या मुलासोबत वाद 

दारूची नशा असल्याने वडिलांनी स्वतःसाठी आणलेली दारू मुलाने पिऊन घेतली. यानंतर तो घरातच झोपून गेला होता. काही वेळानंतर घरी आलेल्या वडिलांना दारूची बाटली दिसली नाही. तर ती दारू पिऊन मुलगा झोपला असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान वडिलांनी आणलेली दारू मुलगा पिल्याने दोघांमध्ये वाद झाला. 

Amravati Crime
Jalna Tragedy: दर्शनासाठी गेले पण परतलेच नाहीत, एकाच घरातील ३ चिमुकल्यांचा मृत्यू, जालन्यात हळहळ

झोपेतच केली पित्याने मारहाण 

दरम्यान दारू पिण्यावरून मुलगा व वडील यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. तर झोपेत असलेल्या ३२ वर्षीय मुलावर पित्याने काठीने वार केले. यामध्ये जबर दुखापत होऊन मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावात खळबळ उडाली. तर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर आरोपी वृद्ध पिता हिरामण धुर्वेला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com