Akola Crime: प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट तरुणीची हत्या, ज्याच्यासाठी दिल्लीहून अकोल्यात आली, त्यानेच काटा काढला

Tattoo artist murdered : दिल्लीतील प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट शांतीक्रिया कश्यप यांची अकोल्यात हत्या, तब्बल ११ महिन्यांनंतर आरोपी चेतन सृंगारे याला मुंबईतून अटक. संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Akola Crime News Update
Akola Crime News UpdateSaam TV news
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Crime News Update : दिल्लीतील 26 वर्षीय तरुणीची अकोल्यातल्या मूर्तिजापूरात हत्या झाली होती. तब्बल ११ महिन्यानंतर आता या प्रकरणातील मारेकरी आरोपीला गजाआड करण्यात आले. चेतन महादेव शृंगारे असं या अटकेतील आरोपीचं नाव आहे. मुबंईतून चेतनला अटक करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरात हे हत्याकांड घडलं होतं.

शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे, तर कुणाल उर्फ़ चेतन महादेव शृंगारे असं तिच्या सोबत राहणाऱ्या मित्राचं नाव आहे. सोबत राहणाऱ्या मित्रानेच तिचा खून केल्याचा संशय मूर्तिजापुर पोलिसांना होता. तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.. घटनेपासून तिचा मित्र चेतन हा फरार होता...

Akola Crime News Update
Akola Shocker: अकोला हादरलं! माजी अभियंत्याची रस्त्यावर हत्या, छातीवर आणि डोक्यावर लोखंडी टिकवाने घाव घातले, CCTV व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय होतं संपूर्ण प्रकरण?

शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) आणि चेतन शृंगारे या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. चेतनने काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापुर शहरात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र, 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात चेतनने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात तरूणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान मृत शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट होती.

दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या-

शांतिक्रीया 21 जुलै 2024 रोजी मुर्तीजापुर शहरात आली होती. त्यावेळी चेतन तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला, त्यानंतर दोघेही तिथून परतले होते. विशेष म्हणजे चेतन पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यानंतर दोघेही मूर्तिजापूरातील प्रतिक नगरमध्ये खोली घेवून राहत होते. चेतनला दारू पिण्याचं व्यसन होतं. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेपासून चेतन फरार होता. मारेकरी चेतन हा यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असल्याचं समजलं होत.

त्याच्याबद्दल माहिती घेतली असता तो सात वर्षांपासून गावात राहत नसल्याची माहिती मिळाली होती. आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या माहितीच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मुंबई येथे जाऊन त्याचा पोलिस स्टेशन सांताक्रुझच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला अन अटक करण्यात अखेर यश आलं.. या आरोपीस ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तब्बल 11 महिन्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आले.

Akola Crime News Update
Akola Shocker: अकोला हादरलं! माजी अभियंत्याची रस्त्यावर हत्या, छातीवर आणि डोक्यावर लोखंडी टिकवाने घाव घातले, CCTV व्हिडिओ व्हायरल

'ती' सतत शिवीगाळ करायची, अन् तोच त्याच्या राग मनात भरला..

चेतन आणि शांतीक्रिया या दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याच प्राथमिक माहिती समोर येत. मुंबईला देखील सोबत राहत होते.. एके दिवशी मुंबईला तिच्या सांगण्यावरून तिच्याच मित्रांनी चेतन याला मारहाण केली होती. आणि दुसरीकडे शांतिक्रीया सतत शिव्या देत त्याच्यासोबत बोलायचे. काही दिवसांनी चेतन अकोल्यातल्या मुर्तीजापुर मध्ये राहायला आला. इथे तिलाही बोलावून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि चेतन्य तिला कायमच संपवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com