Akola Shocker: अकोला हादरलं! माजी अभियंत्याची रस्त्यावर हत्या, छातीवर आणि डोक्यावर लोखंडी टिकवाने घाव घातले, CCTV व्हिडिओ व्हायरल

Akola murder case : अकोल्यात एका 60 वर्षीय माजी उपअभियंत्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लोखंडी टिकासने वार करीत केलं जागीच ठार..
Akola retired engineer Sanjay Kausal murder, Mahendra Pawar arrest
Akola retired engineer Sanjay Kausal murder, Mahendra Pawar arrestSaam TV News
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola retired engineer Sanjay Kausal murder, Mahendra Pawar arrest : अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियांत्याची हत्या करण्यात आली. संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी उपअभियांत्याचं नाव आहे.. कौसल हे अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय कौशल यांचे लहान बंधू आहेत. अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे काल रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास थरारक हत्याकांड घडलं होत. या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे..

दरम्यान, महेंद्र विश्वासराव पवार असं मारेकरी व्यक्तीचं नाव आहे.. महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार आहे, त्याने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करीत त्यांना जागीच ठार केल होत. दरम्यान, अकोल्यातल्या रणपिसे नगरातल्या मुरलीधर टॉवर (इमारत) येथे हे हत्याकांड घडले. विशेष म्हणजे, मारेकरी आणि मृतक हे दोघेही मुरलीधर टॉवर्स येथील रहिवासी आहे. याच अपार्टमेंटच्या प्रवेश गेटसमोर ही संपूर्ण घटना घटना घडली आहे. तसेच संपूर्ण हत्येचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. आरोपीने संजय कौसल यांच्या डोक्यावर सातत्याने लोखंडी टीकासने वार केले. यादरम्यान दोघांनी अडवण्याचा प्रयत्न केला.. मात्र आरोपीचा वार सुरू होता.. जवळपास चार पाच ते सहा वेळा संजय कौसर यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.. दरम्यान जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याचे बोलले जाते. काल रात्री पुन्हा जुना वाद उफाळून आला होता, थोड्यावेळातचं आरोपीने अपार्टमेंटच्या गेट समोर खुर्चीवर बसलेल्या संजय कौसल यांना कायमचं संपवलंय.

Akola retired engineer Sanjay Kausal murder, Mahendra Pawar arrest
Maharashtra Politics : भ्रष्टाचारासाठी बसलेले अवकाळी सरकार, काँग्रेसचा महायुतीवर घणाघात

याआधीही आरोपी महेंद्र पवार एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. काही महिन्यांपूर्वीचं मारेकरी पवार हा न्यायालयीन जामिनीवर बाहेर आला होता. घटनेनंतर पवार हा घटनास्थळावरून पळाला होता. मात्र पोलिसांनी त्याला दोन तासातचं गजाआड केलय.. अकोल्यातल्या जवाहर नगर भागात पायी फिरत असताना त्याला अटक केली. या प्रकरणात सिव्हिल पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयवंत सातव करीत आहेत.

Akola retired engineer Sanjay Kausal murder, Mahendra Pawar arrest
Midnight Accident : मध्यरात्री काळाचा घाला, कार थेट पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू, अकोल्यात हळहळ

दरम्यान, संजय कौसल जिल्हा परिषदच्या लघु सिंचन विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी किशोर सोनोने, अक्षय तायडे यांच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडले. आरोपीने कोणत्या कारणासाठी संजय कौसल यांचा खून केला हे तपासाअंती समोर येणार आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करणार येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com