Midnight Accident : मध्यरात्री काळाचा घाला, कार थेट पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू, अकोल्यात हळहळ

Akola car accident : अकोल्यात बाळापुर-वाडेगाव रस्त्यावर मध्यरात्री कार पुलावरून कोसळून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी. अपघाताची सविस्तर माहिती येथे वाचा.
Akola Balapur road accident
Akola Balapur road accidentSaam TV News
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Balapur road accident : अकोल्यात मध्यरात्री चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. रात्रीच्या अंधारात चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून कोसळली. अकोल्यातल्या वाडेगाव बाळापुर रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. र एक जण गंभीर जखमी आहे. वाहनातील कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत. त्यांच्यावर अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मरण पावलेले व्यक्ती हे बाळापुर शहरातील रहिवासी आहेत.

दरम्यान, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा जवळ असणाऱ्या नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. वाडेगावकडून बाळापूकडे जात असताना मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही घटनास्थळी पोहचत तात्काळ मदत केली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी पाठवले.

Akola Balapur road accident
Car Fire : शिर्डीवरून परत जाताना कारला भयंकर आग, शिक्षकाचा होरपळून मृत्यू, दोन जण वाचले

मिळालेल्या माहितीनुसार, पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची चारचाकी गाडी थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कार जवळपास 5 ते 6 वेळा पलटी होत खाली कोसळली. या वाहनातील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, मांडवा कुपटा येथील ग्रामस्थांनी गाडीमध्ये असलेल्या जखमींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. तातडीने सर्व जखमींना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील तिघांचा वाटेतचं मृत्यू झाला होता. या प्रकरणात बाळापुर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

Akola Balapur road accident
Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडलं, CDS अनिल चौहान यांची कबुली
Akola Balapur road accident
Bhandara Accident : विचित्र अपघात, ऑटोला दुचाकी धडकली, महामार्गावर पडलेल्या दोघांना कारने चिरडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com