Baramati Crime Saam Tv
क्राईम

Baramati Crime: लग्नासाठी दबाव, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; गावातील तरुणांच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Baramati Shocking News: बारामतीमध्ये १६ वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करून गावातील तरुण लग्नासाठी दबाव टाकत होते. तसंच लग्नाला नकार दिल्यानंतर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होते. सततच्या या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली.

Priya More

मंगेश कचरे, बारामती

बारामतीमध्ये गावातील तरुणांच्या त्रासाला कंटाळून एका १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्दमध्ये ही घटना घडली आहे. हे तरुण लग्नासाठी दबाव करत कुटुंबीयांना जीवे मारण्याची वारंवार धमकी देत होते. या छळाला कंटाळून मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीने ८ एप्रिल रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. तिला गावातील काही तरुण त्रास देत होते. वारंवर लग्नासाठी दबाव टाकत होते. या मानसिक त्रासाला ती कंटाळली होती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत तिने आयुष्य संपवलं.

आत्महत्या केलेल्या मुलीला काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे आणि सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात होता अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता.

तरुणांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT