Nashik Crime : व्यावसायिक अपहरणाची उकल; चौघांना घेतले ताब्यात, रक्कम घेऊन एकजण फरार

Nashik News : संशयितांनी निखिल यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याच कारमध्ये बसवून नेत त्यांच्याकडे एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. घोटी- इगतपुरी दरम्यान निखिल यांना दुसऱ्या वाहनात बसविण्यात आले
Nashik Crime
Nashik CrimeSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकमधील व्यावसायिक असलेले निखिल दर्यानानी यांचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या चौघांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. यामध्ये परराज्यातील दोघांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांपासून युनिट एकचे पथक संशयितांच्या मागावर होते. अपहरणकर्ते हे सराईत गुन्हेगार असून पाचवा संशयित अद्याप फरार आहे. 

नाशिक शहरातील व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचे ४ एप्रिलला दुपारी काठेगल्लीतून त्यांच्या कारमधूनचा तिघांनी मिळून अपहरण केले होते. या प्रकारात संशयितांनी निखिल यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याच कारमध्ये बसवून घोटीच्या दिशेने नेत त्यांच्याकडे एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. दरम्यान घोटी- इगतपुरी दरम्यान निखिल यांना दुसऱ्या वाहनात बसविण्यात आले.  

Nashik Crime
Gold Price : सोने मोडच्या प्रमाणात ४५ टक्क्यांनी वाढ; सोशल मीडियावरील मॅसेजने पसरला भ्रम

व्यावसायिकाची कार नाशिकला आणत घेतली खंडणी 

तर व्यावसायिक दर्यानानी यांची कार तिसरा संशयित परत नाशिकला घेऊन आला. यानंतर त्याने खंडणीची १५ लाख रुपयांची रोकड स्वीकारली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. अपहरण नाट्याची उकल होत नसल्याने सदरचा प्रकार बनाव असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत होता. परंतु गेल्या पाच- सहा दिवसांपासून गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरु केला. 

Nashik Crime
Washim Accident : राज्यात पुन्हा 'हिट अँड रन'; भीषण अपघातात बापलेकीचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

चोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तांत्रिक तपास करत संशयितांचा माग काढून परजिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेतले. यानंतर दोघांना नाशिकमधून अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार रक्कम घेऊन फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिस तपासातून या अपहरण नाट्याची उकल झाली असून संशयितांचे कटकारस्थान, त्यांच्या मागे आणखी कोण याची उकल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com