नाशिक : एकीकडे सोने- चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरु आहे. यामुळे सोशल मीडियावर देखील सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असल्याचा संदेश फिरत आहे. यामुळे नुकसान टाळण्यासाठी वाढलेल्या दरात सोने मोडीत काढण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे सराफ व्यावसायिकांकडे देखील रोखीने देण्याचे पैसे नसल्याची स्थिती आता नाशिकमध्ये निर्माण झाली आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याचे सर्व्हे तसंच सोन्याचे दर कमी होतील; अशा सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजमुळे सोन्याचे दर कमी होणार असल्याचा भ्रम बाजारात पसरला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तीन दिवसांपासून खरेदीपेक्षा सोन्याची मोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. सराफ व्यावसायिकांच्या माहितीनुसार मागील महिन्याच्या विचार केल्यास सोने मोडीत काढण्याचं प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढले आहे.
सराफ व्यावसायिकांकडून पोस्ट डेटेड चेक
सोन्याची मोड करण्याचे प्रमाण वाढले असल्याने सराफ व्यावसायिकांना यामुळे अधिक नियोजन करावं लागत आहे. मोड करणाऱ्यांना पोस्ट डेटेड चेक देण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सोन्यासंदर्भातील पोस्टमुळे सोने मोडीत काढण्याचा धडाका सुरू असला तरी बुधवारी सोन्याचे दर प्रति ग्रॅम दोन हजार रुपयांनी वाढले असून जीएसटीसह चोख सोन्याचे दर ९३ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान मोड करणाऱ्यांमध्ये ज्यांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करून ठेवले आहे. त्यांची संख्या जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. दर ९३ हजारांवर असल्याने एका क्षमतेपलिकडे मोडीचे पैसे देण्यासाठी सराफा व्यावसायिकांना मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असं सराफा व्यावसायिकांच म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.