Solapur Crime: दारू पिऊन घरी आला, बायकोचा जीव घेतला; नशा उतरताच केली आत्महत्या

Solapur Police: सोलापूरमध्ये दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. सकाळी नशा उतरल्यानंतर या व्यक्तीने घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
Solapur Crime: दारू पिऊन घरी आला, बायकोचा जीव घेतला; नशा उतरताच केली आत्महत्या
Solapur Crime Saam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करून स्वत:ची आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत आधी बायकोला जीवे मारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवऱ्याने स्वतः आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील शेलगाव आर गावात ही घटना घडली. दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बायकोचा मृत्यू झाला. त्यानंतर नवऱ्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव आर गावातील वसंत पवार हे आपल्या पत्नी आयनाबाई उर्फ सोनाबाई वसंत पवारसोबत राहत होते. वसंत पवारला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी यायचा यामुळे वारंवार बायकोसोबत त्याचे भांडण व्हायचे. मंगळवारी वसंत पवार नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला. त्याचे बायकोसोबत किरकोळ भांडण झाले आणि हे भांडण विकोपाला गेले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने बायकोची हत्या केली. दुसऱ्या दिवशी त्याने देखील आत्महत्या केली.

Solapur Crime: दारू पिऊन घरी आला, बायकोचा जीव घेतला; नशा उतरताच केली आत्महत्या
Nashik Crime: नाशिक हादरले! सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंत पवारने सोनाबाई आणि वडील अंबादास या दोघांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली होती. सोनाबाई यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर वसंतचे वडील अंबादास यांचा हात मारहाणीत फ्रॅक्चर झाला.

Solapur Crime: दारू पिऊन घरी आला, बायकोचा जीव घेतला; नशा उतरताच केली आत्महत्या
Husband-wife crime : बॉयफ्रेंडसोबत भविष्याचा प्लान आखला, सरकारी नोकरीसाठी नवऱ्याला संपवलं

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री प्यायलेल्या दारूची नशा उतरल्यानंतर वसंत पवारने सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली.

Solapur Crime: दारू पिऊन घरी आला, बायकोचा जीव घेतला; नशा उतरताच केली आत्महत्या
Pune Crime: वाहनाला सोसायटीचे स्टिकर नसल्याने अडवले, सुरक्षारक्षकांकडून तरुणाला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com