माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

Egg Attack on Imran Khan’s Sister: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी हल्ला. घटना रावळपिंडीतील अडियाला तुरुंगाबाहेर पत्रकारांशी बोलताना घडली.
Egg Attack on Imran Khan’s Sister
Egg Attack on Imran Khan’s SisterSaam
Published On
Summary
  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी हल्ला

  • घटना रावळपिंडीतील अडियाला तुरुंगाबाहेर पत्रकारांशी बोलताना घडली

  • अंडी फेकणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल, पाकिस्तानात राजकीय चर्चेला ऊत

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलीमा खान यांच्यावर अंडी फेकण्यात आली. ही घटना रावळपिंडीतील अडियाला तुरूंगाबाहेर घडली. त्या पत्रकारांशी बोलत असताना अचानक अज्ञात महिलांनी अंडी फेकून हल्ला केला. शु्क्रवारी तुरूंगाबाहेर इम्रान यांच्या प्रकरणांबद्दल बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. अलीमावर अंडी फेकणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पत्रकारांशी बोलताना अलीमा यांच्यावर अंडी फेकल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर पाकिस्तान तहरीक - ए - इंसाफ (पीटीआय) समर्थकांनी दोन्ही महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Egg Attack on Imran Khan’s Sister
'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

रावळपिंडी पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या महिला पीटीआयच्या समर्थक असून, त्या ऑल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ग्रँड अलायन्सच्या सदस्यांसह त्यांच्या मागण्यांसाठी निषेध करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहिल्यानं त्यांनी अंडी फेकल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच अडियाला पोलीस स्टेशनमध्ये नेले आहे.

पीटीआय पक्षाने या घटनेला लज्जास्पद आणि राजकीय अजेंड्याचा भाग म्हटले आहे. 'या महिलांना ठराविक हेतूनं अलीमा यांच्या पत्रकार परिषदेत पाठवण्यात आले आहे', असं पक्षाने निवेदनात म्हटलं आहे. पाकिस्तानमधील इतर अनेक प्रमुख राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

Egg Attack on Imran Khan’s Sister
लालबागचा राजाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर हिट अँड रन; भरधाव वाहनाने मुलांना चिरडलं; 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com