
वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. नंतर स्वत: आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. रागाच्या भरात पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात पतीने लोखंडी रॉडने वार केले. तसेच विळ्यानेही वार केले. नंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नेमकं घडलं काय?
ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री (खरबी) या गावात घडली आहे. मृत पतीचे नाव गौतम वर (वय वर्ष ५२) तर, पत्नीचे नाव ज्योती गौतम वर (वय वर्ष ४५) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू होते. अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांमध्ये कायम भांडणं होत असे. पती पत्नीमध्ये वाद होत असतानाच या वादाला हिंसक वळण लागले.
पत्नी झोपेत असतानाच तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. तसेच विळ्याने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:च्या रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराशेजारील टिनशेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक वादाचे भीषण परिणाम पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.