गुजरातच्या सूरत शहरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. २३ वर्षांच्या ट्यूशन टीचरने १३ वर्षांच्या विद्यार्थ्याला घेऊन पळाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी चार दिवसांनी दोघांना शोधलं. शिक्षिका ५ महिन्यांची गरोदर असल्याचंही समोर आलं आहे. पोटातलं बाळं हे सोबत घेऊन पळालेल्या विद्यार्थ्याचं असल्याचा शिक्षिकेचा दावा आहे.
२३ वर्षीय शिक्षिकेने दावा केल्याने खळबळ उडालीये. शिक्षिकेचा दावा खरा आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याला घेऊन पळालेल्या शिक्षिकेला राजस्थान आणि गुजरातच्या सीमेजवळील बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजीजवळ पकडलं. दोघेही दुसऱ्या ठिकाणी पळ काढण्याच्या तयारीत होते. पोलिसांच्या भीतीमुळे महिलेने मोबाईल बंद केला होता. परंतु तिचा दुसरा मोबाईल सुरु होता. दुसरा मोबाईल ट्रॅक करत पोलिसांनी दोघांना शोधून काढलं.
मीडिया रिपोर्टनुसार, शिक्षिका अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण करत होती. दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आहेत. शिक्षिकेने दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्याचेही मान्य केलं आहे. पोलिसांनी महिलेच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, 'महिला सरकारी प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. शिक्षिका गेल्या ३ वर्षांपासून तिच्या घरात कोचिंग क्लास घेत होती. दोघे एकाच इमारतीत राहत होते. शिक्षिका मूळची गुजरातची आहे.
सूरतचे पोलीस उपायुक्त भागीरथ सिंह गढवी म्हणाले की, 'शिक्षिकेची चौकशी केली. त्यावेळी तिने मुलासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे मान्य केलं. शिक्षिकेविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा नोदंवला आहे. पोलिसांनी शिक्षिका आणि विद्यार्थ्याची वैद्यकीय चाचणी करणार असल्याचं म्हटलं आहे.
दोघे २५ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाले होते. यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. अल्पवयीन मुलगा शिक्षिकेसोबत गेला होता. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्हीचा आधार घेत पुष्टी केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बेपत्ता झाल्यानंतर दोघांना ४ दिवसांनी पकडलं. मागील पाच दिवसांत दोघे बडोदा, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, वृदांवनमध्ये फिरत होते. दोन दिवस ते जयपूरमध्ये थांबले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना राजस्थान बॉर्डरजवळ पकडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.