Sakshi Sunil Jadhav
केसांना स्मूद आणि शायनी बनवायचे असतील तर अनेक महिला केसांची केरीटीन ट्रिटमेंट करत असतात. पण यामध्ये खूप पैसा खर्च होतो. पुढील काही सोप्या पद्धतीतच तुम्ही घरच्याघरी ही ट्रिटमेंट करु शकता.
तुम्हाला यासाठी २ अंडींचा पांढरा भाग, २ चमचे मध आणि अर्धी वाटी नारळाचं तेल इतके साहित्य पुरेसं आहे.
सर्वात आधी एका भांड्यात अंड फोडून घ्या. मग त्यातला पिवळा भाग काढून टाका.
आता अंड्यामध्ये मध आणि नारळाचे तेल मिक्स करा आणि फेटून घ्या.
संपूर्ण मिश्रण मिक्स झालं की कोरड्या केसांना लावून घ्या. केस खूपच कोरडे असतील तर थंड पाण्याने थोडे ओले करु शकता.
काही वेळाने म्हणजे साधारण १५ मिनिटांनी तुम्ही हे मास्क शॅम्पू आणि कंडीशनरने स्वच्छ धुवून घ्या.
केस धुताना चांगल्या शॅम्पूचाच वापर करा आणि केस स्वच्छ धुवून घ्या. त्याने केसांचा वास येणार नाही.
तुम्ही ही ट्रिटमेंट घरच्याघरी हप्त्यातून २ वेळेस करु शकता. याने तुमचे केस काहीच दिवसांत सुंदर दिसतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.