Minor Girl Trafficking Case: मुली विकण्याचा सुळसुळाट! १०-१५ हजारात विकायची मुलींना, 'अशी' सापडली पोलिसांच्या जाळ्यात

Human Trafficking Investigation: निशू तियू ही महिला मुलींना १० ते १५ हजारात अंजली कच्छपकडे विकायची. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तसेच आरोपीला अटक केली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

एका अल्पवयीन मुलीला विकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निशू तियूला अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने मुली विकण्याच्या प्रकरणात तिचा सहभाग असल्याचं कबूल केलं. तिचे काम मुलींना रांचीच्या अंजली कच्छपकडे पोहोचवणे होते. या बदल्यात तिला १० ते १५ हजार रुपये मिळत असे. ही धक्कादायक घटना जमशेदपूरच्या परसुडीह लोको कॉलनीत घडलीय. या संतापजनक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जमशेदपूरमध्ये मुलींना विकण्याचा प्रकार घडला आहे. निशू तियू ही महिला मुलींना १० ते १५ हजारात अंजली कच्छपकडे विकायची. अंजली कच्छप पूर्वी दिल्लीमध्ये काम करायची. या वेळी निशू तियूची भेट अंजली कच्छपसोबत झाली. भेट घडल्यानंतर अंजली कच्छपने आपल्या कामाची माहिती निशू तियूला दिली. नंतर ती देखील या कामात सामील झाली.

Crime News
Road Accident: संभाजीनगरत भीषण अपघात, पिकअपची ट्रॉलीला धडक, आगीचा भडका उडाला, दोघांचा मृत्यू

या प्रकरणात निशू तियू मुलींना १० ते १५ हजारात विकत असल्याची माहिती समोर आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. पोलिसांना हा प्रकार घडत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली. चौकशीत पोलिसांनी शनिवारी निशू तियू या महिला आरोपीला अटक केली.

Crime News
OYO Company: व्हॅलेंटाईन डेपूर्वी ओयो कंपनीची भरभराट! कंपनीचा नफा ६ पट वाढला

परसुडीह पोलिस ठाण्यात चौकशी केल्यानंतर पोलिसांनी निशू तियूला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यातच आलंय. चौकशीदरम्यान आरोपी महिला डुमरियाची रहिवासी असल्याचं समोर आलं. तसेच तिचे लग्न झाले आहे. निशू तियू या महिला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आता अंजली कच्छपच्या शोधत आहेत.

आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली कच्छप एका मुलीला ट्रेनने दिल्लीला घेऊन जात होती. संशय आल्यानं रेल्वे पोलिसांना आरोपी आणि मुलीची चौकशी केली. चौकशीत मुलीला विकण्यासाठी अंजली कच्छप नेत असल्याचं समोर आलं. दरम्यान, आरोपी अंजली पोलिसांना चकमा देऊन पलायन करण्यास यशस्वी ठरली. मुलीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com