OYO Company: व्हॅलेंटाईन डेपूर्वी ओयो कंपनीची भरभराट! कंपनीचा नफा ६ पट वाढला

OYO Financial Growth and Global Performance: ओयोची जादू सुरूच आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने १६६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी कंपनीनं २५ कोटींचा नफा कमावला होता. यामध्ये आता सहा पट वाढ झाली आहे.
oyo
oyosaam tv
Published On

अविवाहित जोडप्यांना ओयोने प्रवेश बंदी केल्यानंतर पुन्हा एकदा ओयोची चर्चा होत आहे. ओयोची जादू सुरूच आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने १६६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी कंपनीनं २५ कोटींचा नफा कमावला होता. यामध्ये आता सहा पट वाढ झाली आहे. कंपनीचे उत्पन्न १,६९५ कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या १,२९६ कोटी रुपयांपेक्षा हे ३१ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ओयोने चांगली कामगिरी केली आहे.

एकूण बुकिंग मूल्य (GBV) ₹३,३४१ कोटींवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या २,५१० कोटी रुपयांपेक्षा हे ३३ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी ओयो कंपनीचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षी १११ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, आता ओयोने सुरुवातीलाच ४५७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

oyo
Dombivali News: जेवण सांडण्यावरून वाद टोकाला गेला, रागात मजुराने सहकाऱ्यालाच संपवलं; डोंबिवलीतील खळबळजनक घटना

..म्हणून झाली वाढ

भारत आणि अमेरिकासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कंपनीच्या चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ झाली आहे. याशिवाय, दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांनी देखील कंपनीला मदत केली आहे. भारतात सेवा प्रीमियम बनवण्याव्यतिरिक्त, कंपनीने अमेरिकन हॉटेल कंपनी G6 हॉस्पिटॅलिटी आणि पॅरिसस्थित घर भाड्याने देणारी कंपनी चेक माय गेस्ट देखील विकत घेतली आहे.

oyo
Road Accident: संभाजीनगरत भीषण अपघात, पिकअपची ट्रॉलीला धडक, आगीचा भडका उडाला, दोघांचा मृत्यू

जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने ओयोचे रेटिंग बी३ वरून बी२ पर्यंत वाढवले आहे. मूडीजचा अंदाज आहे की, ओयोचा EBITDA आर्थिक वर्ष २५-२६ मध्ये २०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. आता कंपनीचे अधिक लक्ष उत्पन्न वाढवण्यावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com