Nanded News Saam Tv
क्राईम

Shocking : नांदेडमध्ये सैराट! बापाने मुलीला अन् तिच्या प्रियकराला संपवलं, हातपाय बांधून विहिरीत फेकलं

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडच्या उमरी तालुक्यात वडिलांनी विवाहित मुलगी आणि प्रियकराचा खून करून विहिरीत फेकले.

  • मृतांची नावे लखन भंडारे आणि संजीवनी कमळे अशी आहेत.

  • आरोपी वडील मारोती सुरणे आणि त्यांचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहेत.

  • घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. करकाळा शिवारात एका वडिलांनी आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरातच नव्हे तर जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रेमी युगलांची नावे लखन भंडारे आणि संजीवनी कमळे अशी आहेत. संजीवनी ही विवाहित असूनही तिचा लखन भंडारे याच्याशी प्रेमसंबंध होता. लखन भंडारे हा संजीवनीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता. त्याच वेळी सासरच्या मंडळींना या दोघांच्या नात्याबद्दल समजलं. त्याच क्षणी त्यांनी त्यांना पकडून मुलीच्या वडिलांना याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे मुलीचे वडील मारोती सुरणे हे संतापाच्या भरात घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत इतर दोन जणही होते. तिघांनी मिळून या प्रेमी युगलाला मारले. त्यानंतर अत्यंत थरकाप उडवणारे पाऊल उचलत दोघांचेही हातपाय बांधले आणि त्यांना जिवंतपणीच शेतातील विहिरीत फेकून दिले. काही तासांनंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. आरोपी वडिलांसह इतर दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. एका वडिलांनी स्वतःच्या मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा इतक्या क्रूर पद्धतीने हत्या केल्याने गाव हादरले आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तपासाच्या अनुषंगाने या प्रकरणातील आणखी काही बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

SCROLL FOR NEXT