Nanded Flood : सहा दिवसापासून गावांचा संपर्क तुटलेला; वैद्यकीय पथक बोटीद्वारे गावात दाखल, गरोदर महिलेचे रेस्क्यू

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सिरपल्ली आणि डोलारी गावात महसूल प्रशासन आणि आरोग्य पथक बोटीद्वारे पोहोचले असून गावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली
Nanded Flood
Nanded FloodSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून थैमान सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आज देखील नांदेड जिल्ह्यातील काही गावांत पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान जिल्ह्यात सिरपल्ली व डोलारी या गावांचा सहा दिवसांपासून संपर्क तुटलेला असून आज प्रशासन बोटीद्वारे गावात पोहचले आहे. यात गरोदर महिलेचे रेस्क्यू करत रुग्णालयात नेण्यात आले. 

राज्यात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावांचा संपर्क देखील तुटला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली आणि डोलारी या गावचा मागील सहा दिवसापासून संपर्क तुटलेला आहे. आज देखील या दोन्ही गावांना पुराचा वेढा आहे. 

Nanded Flood
Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

महसूल व आरोग्य पथक गावात दाखल 

पैनगंगा नदी तीरावर सिरपल्ली व डोलारी हे दोन गावे आहेत. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुराने या गावाला वेढा घातला आहे. मातील सहा दिवसांपासुन दोन्ही गवे संपर्कात नसून प्रशासन गावांपर्यंत पोहचले आहे. महसूल विभागाचे पथक आणि वैद्यकीय पथक बोटीद्वारे या गावात आज दाखल झाले आहे. याठिकाणचा आढावा या पथकाद्वारे घेण्यात आला आहे. 

Nanded Flood
Bail Pola Festival : बुलढाण्यात पोळा सणावर निर्बंध; लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शेतकऱ्यांची मात्र नाराजी

गावात जाऊन आरोग्य तपासणी 

दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने एका गरोदर महिलेला बोटीद्वारे रेस्क्यू करण्यात आले आहे. तर महसूल प्रशासनाच्या पथकाने गावात पोहोचून गावकऱ्यांना धीर दिला. वैद्यकीय पथकाने गावातील नागरिकांची तपासणी केली. आजारी असलेल्या रुग्णांवर औषध उपचार करण्यात आले. या दोन्ही गावातील गावकरी सुखरूपासून महसूल प्रशासन सातत्याने या दोन्ही गावाच्या संपर्कात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com