Bail Pola Festival : बुलढाण्यात पोळा सणावर निर्बंध; लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शेतकऱ्यांची मात्र नाराजी

Buldhana News : खामगाव शहरात गुरांच्या आठवडी बाजारात शेकडो जनावरे एकत्र असल्याने सणावर लावलेल्या निर्बंधबाबतच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केला आहे
Bail Pola Festival
Bail Pola FestivalSaam tv
Published On

बुलढाणा : कृषीप्रधान देशात पोळा या सणाचे शेतकऱ्यांना वेगळेच महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबत असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. मात्र बुलढाणा जिल्ह्यात पोळा सण साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. लंपीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहे. अर्थात वर्षातून एक दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरा करण्याची शेतकऱ्यांची तयारी झाली आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

Bail Pola Festival
Bail Pola : सातपुड्यात आहे बैलांचे ब्युटी पार्लर; पोळ्यासाठी महिला तयार करतात खास बैलांचा शृंगार

गुरांच्या बाजारावरून शेतकऱ्यांनी घेतला आक्षेप 

दरम्यान आज गुरुवार असल्याने खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेले आहेत. हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. यावर बोट ठेवत आम्ही पोळा साजरा करणारच! जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का? फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का? असे सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक साजरा न करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. 

Bail Pola Festival
Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

सण साजरा करण्यावर शेतकरी ठाम 

पोळा सण उद्याच्या दिवशी साजरा केला जात असल्याने शेतकऱ्यांची त्या अनुषंगाने तयारी झाली आहे. अर्थात गावात बैलांची मिरवणूक काढत हा सण साजरा केला जातो. यामुळे आजच्या आदेशावर अनेक शेतकरी आक्रमक होत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे आता यावर बुलढाणा जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com