Nashik Crime News Saam Tv
क्राईम

Nashik Crime : नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार; टोळक्याकडून जामिनावर सुटलेल्या गुंडाची दगडाने ठेचून हत्या, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार घडला. नाशिकमध्ये टोळक्याकडून अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

तबरेझ शेख, साम टीव्ही

नाशिक : नाशिकमध्ये सोमवारी दुपारी रक्तरंजित थरार घडला. नाशिकच्या अंबडमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना घडली. नाशिकच्या अंबडमधील कामटवाडा परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. अल्पयवयीन मुलाच्या हत्येने नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या कामटवाडा येथे एका १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना घडली. नाशिकमध्ये सोमवारी दुपारच्या वेळेस ही घटना घडली. पोलीस तपासात या हत्याकांडातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांमध्ये वादाचा भडका उडाला.

कामटवाड्यात करण चौरे या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. 10 दिवसांपूर्वीच तो बाल सुधारगृहातून सुटून आला होता. ८ मार्चला संत कबीरनगरात अरुण बंडी याचा करण चौरेसह सहा संशयितांनी दगडाने ठेचून हत्या केली. त्याचा बदला घेत बंडीच्या गँगमधील चिमण्या आणि सहा साथीदारांनी त्याच पद्धतीने करणला डोक्यात दगड घालून संपवलं.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी चिमण्या उर्फ महेश सोनवणे, सुमित बगाटे या संशयितांसह चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील सर्व संशयित आपापल्या परिसरात भाईगिरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अरुण बंडी याचा ८ मार्चला संत कबीरनगरात डोक्यात दगड घालून खून झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याच प्रकारे करणचा खून करून घेण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT