Kalyan Crime Saam Tv
क्राईम

Kalyan Crime: मैत्रीने केला घात! तरुणीला महिनाभर डांबून ठेवलं, नशेचे इंजेक्शन देऊन सामूहिक बलात्कार

Titwala Crime News: कल्याणजवळच्या टिटवाळ्यामध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला तिच्याच मैत्रिणींनी फसवलं. या तरुणीला महिनाभर घरात कोंडून ठेवलं. या तरुणीवर तिच्या मैत्रिणींच्या मित्रांनी नशेचे इंजेक्शन देऊन सामूहिक बलात्कार केला.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

नशेचे इंजेक्शन देऊन तरुणाला कोंडून ठेवून महिनाभर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणजवळील टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात मैत्रिणीसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

टिटवाळाजवळील बल्याणी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे आजीबरोबर भांडण झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली. मात्र या मैत्रिणीने तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत कोंडून ठेवले. तर मैत्रिणीच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तिच्यावर महिनाभर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. शबनम, जीनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली ईराणी आणि एक अनोळखी व्यक्ती अशी या आरोपींची नावे आहेत. ते फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बल्याणी परिसरात आपली आजी आणि चुलत भाऊ बहिणीसोबत राहणारी २१ वर्षीय तरुणी बांधकाम साईटवर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. १९ मार्च रोजी रात्री १० वाजता या तरुणीचे आजीसोबत भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात तिने घर सोडले. बांधकाम साईटवर काम करताना तिची जिनत नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. याच मैत्रिणीच्या घरी राहण्यासाठी निघून गेली. तर दुसरी मैत्रीण शबनम तिच्याच शेजारी राहत असल्याने सदरची तरुणी कधी जीनतच्या तर कधी शबनमच्या घरी राहत होती. १० दिवसानंतर तिने आपण घरी जात असल्याचे मैत्रीणीना सांगताच त्या दोघींनी सगनमत करून आपला मित्र गुड्डूला कार घेऊन बोलावले.

गुड्डू आणि त्याच्याबरोबर तरुणीच्या ओळखीचा असलेला गुलफाम असे दोघे कार घेऊन आल्यानंतर शबनम आणि झीनत यांनी या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. मात्र तरुणीला घरी न सोडता तिला एनआरसी कंपनीच्या मागे असलेल्या चाळीचे काम दाखविण्याच्या बहाण्याने नेले. तिथे नेल्यानंतर शबनमने या तरुणीच्या मानेवर इंजेक्शन देत तिला बेशुद्ध केले. बेशुद्ध अवस्थेतच तिला रामबाग येथील लियाकतच्या रूममध्ये सोडण्यात आले. तिथे लियाकतने तिच्यावर बेशुद्ध असतानाच बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे. सलग चार ते पाच दिवस त्याने तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर येताच पुन्हा नशेचे इंजेक्शन देत तो तिच्यावर बलात्कार करत होता.

तरुणीने तक्रारीत असे देखील सांगितले आहे की, आपल्याला घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतर या पाच जणांनी आंबिवली येथील आली इराणीला बोलावून घेत मला तक्रार केल्यास फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी देत आजीविरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. यानंतर या तरुणीला सातत्याने नशेचे औषध देत कधी आंबिवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकतच्या घरी नेत तिच्यावर सातत्याने बलात्कार केले.

दरम्यान ३ मे रोजी रात्री १२ वाजता आंबिवली येथील चाळीत तरुणी एकटीच असताना शुद्धीवर येताच तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला कुलूप असल्याने तिने खिडकीतून जोरजोरात रडून आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केल्यानंतर एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला तिथून बाहेर काढत तिच्या आजीच्या घरी सोडले.

तब्बल महिनाभर या तरुणीवर सातत्याने बलात्कार होत असल्याने शरीराने आणि मनाने ती पूर्णपणे खचलेली होती. या तरुणीला आजीने धीर दिल्यानंतर मंगळवारी तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. याप्रकरणी शबनम, जीनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली ईराणी याच्यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीविरोधात टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT